अभिनेत्री जिनिलीया देशमुख आणि अभिनेता रितेश देशमुख यांची जोडी मराठीसह बॉलीवूड कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. या दोघांकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. रितेशचे वडील महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बाभळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. परंतु, वैयक्तिक आयुष्यात रितेशने वडिलांपेक्षा वेगळा मार्ग निवडत मनोरंजनसृष्टीत आपलं नशीब आजमावलं. त्याचे दोन्ही भाऊ राजकारणात सक्रिय आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लातूर येथील बाभळगाव मतदान केंद्रावर जाऊन रितेश देशमुख याने कुटुंबीयांबरोबर मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी अभिनेत्याबरोबर त्याची आई वैशाली देशमुख व पत्नी जिनिलीया उपस्थित होती.

हेही वाचा : थाटात लग्न केल्यावर ‘कन्यादान’ फेम जोडी निघाली हनिमूनला; पासपोर्टचा फोटो शेअर करत म्हणाले…

रितेश देशमुख यावेळी माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला, “मी मुंबईहून लातूरला खास मतदान करण्यासाठी आलो होतो. सगळ्या नागरिकांनी घराबाहेर पडून नक्की मतदान केलं पाहिजे कारण, आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. आज रात्री परतीची ट्रेन आहे आमची…त्याने आम्ही परत मुंबईला जाणार आहोत. ऊन प्रचंड आहे. पण एक दिवस थोडा त्रास सहन करा… आपण आपल्या देशासाठी एवढं करूच शकतो. प्रत्येकाला वाटतं की, एका मताने काय फरक पडणार पण, प्रत्येकाचं एक-एक मत महत्त्वाचं असतं.”

हेही वाचा : “पहिली गाडी घेतली पण, तेव्हा बाबा नव्हते”, वडिलांच्या आठवणीत गौरव मोरे भावुक; म्हणाला, “मी आणि आई…”

तसेच यावेळी “आजचा दिवस महत्त्वाचा असल्याने प्रत्येक नागरिकाने मतदान करणं गरजेचं आहे” असं माझं प्रामाणिक मत असल्याचं जिनिलीयाने सांगितलं. रितेशने लातूरमध्ये आई व पत्नीसह मतदानाचा अधिकार बजावला. तसेच राजकारणात प्रवेश करण्याच्या सगळ्या चर्चा फेटाळल्या. तो म्हणाला, “माझे दोन भाऊ असताना माझी काय गरज? सध्या मतदानाचा टक्का घसरत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी फक्त आवर्जुन मतदान करा.”

हेही वाचा : “तेव्हा माझं करिअर संपेल”, सलमान खानने ३४ वर्षांपूर्वी लिहिलेलं ‘ते’ पत्र व्हायरल; चाहत्यांना म्हणाला होता…

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळेचा स्विमिंग पूलमधला फोटो पाहून चाहते म्हणतात, “आईसाहेब मारतील…”

दरम्यान, रितेश-जिनिलीयाच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता लवकरच ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटात झळकणार आहे. तर, अभिनेत्री जिनिलीया देशमुख लवकरच आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. प्रेक्षक या दोन्ही चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lok sabha election voting genelia and riteish deshmukh cast their vote at latur maharashtra sva 00