‘तारीख पे तारीख..’ हे शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर लगेच ‘दामिनी’ चित्रपटातला सनी देओल आठवतो. ‘बेताब’ या चित्रपटाद्वारे त्याची कारकीर्द सुरु झाली. बॉलिवूडमध्ये चॉकलेट हिरो म्हणून पदार्पण करणाऱ्या सनीला अॅक्शन ही चित्रपट शैली रुचली. नव्वदच्या दशकामध्ये त्याचे बरेचसे अॅक्शनपट सुपरहिट झाले. या काळामध्ये त्याच्या चित्रपटाचा वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता. ‘दामिनी’, ‘गदर’, ‘घायल’ यांसारख्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. पुढे शाहरुख, सलमान, हृतिक रोशन यांच्या येण्याने त्याची लोकप्रियता कमीकमी होत गेली.
धर्मेंद्र यांच्याप्रमाणे सनी देओलचे खासगी आयुष्यही खूप चर्चेत होते. ‘बेताब’मध्ये त्याच्यासह अमृता सिंहने काम केले होते. हा तिचाही पहिला चित्रपट होता. चित्रीकरणादरम्यान त्यांच्यामध्ये जवळीक वाढली. याच सुमारास त्याचे पूजा देओलशी लग्न झाले होते. या लग्नाची माहिती मिळताच अमृताने त्याच्याशी असलेले सर्व नातेसंबंध तोडले. त्यानंतर त्याचे नाव अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीशी जोडण्यात आले. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दामिनी’ या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यांनी एकत्र काम केले होते. तेव्हा ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा रंगल्या होत्या.
बॉलिवूडमध्ये सनी देओल आणि डिंपल कपाडिया यांचे अफेअर खूप गाजले. वयाच्या सोळाव्या वर्षी डिंपल यांनी राजेश खन्नांशी लग्न केले. काही वर्षांनंतर त्यांच्यामध्ये दुरावा आल्याने त्या वेगळ्या राहू लागल्या. त्यानंतर त्यांच्या आयुष्यात सनीची एन्टी झाली. पुढे ते डेट करायला लागले. त्यावेळी ते दोघेही विवाहित होते. त्यांनी ‘नरसिंहा’, ‘अर्जुन’, ‘आग का गोला’, ‘मंजिल मंजिल’, ‘गुनाह’ अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. पूजा देओल यांनी मुलांना घेऊन घर सोडून जाण्याची धमकी दिल्याने या नात्याचा शेवट झाला.
आणखी वाचा – “मला डावलून त्याने… ” अक्षयने आमिर खानबाबत केला खुलासा
रविना टंडन आणि सनी देओल जिद्दी, क्षत्रिय अशा चित्रपटांमध्ये सोबत झळकले होते. त्यावेेळी त्यांचे अफेअर सुरु असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. प्रेक्षकांना त्याची जोडी पसंतीस पडली होती.