Loveyapa Box Office Collection Day 1: बॉलीवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान व बोनी कपूर- दिवंगत श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूर या दोघांचाही ‘लवयापा’ चित्रपट शुक्रवारी (७ फेब्रुवारीला) रिलीज झाला. खुशी व जुनैद यांचा थिएटरमध्ये रिलीज झालेला पहिला चित्रपट आहे. या रोमँटिक कॉमेडी चित्रपटाचं दोघेही जोरदार प्रमोशन करत होते. अखेर चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

अद्वैत चंदन दिग्दर्शित ‘लवयापा’ हा २०२२ मध्ये आलेल्या तमिळ चित्रपट ‘लव्ह टुडे’चा रिमेक आहे. ‘लवयापा’ व्हॅलेंटाईन वीकमध्ये रिलीज झाला तआहे. मात्र, या सिनेमाला प्रेक्षकांचे फार प्रेम मिळालेले नाही.

रिलीजच्या पहिल्याच दिवशी या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाने निराशाजनक कामगिरी केली. बऱ्याच ठिकाणी थिएटर्स खाली असल्याचे चित्र दिसून आले. ट्रेलरला आणि गाण्यांनाही विशेष प्रतिसाद मिळाला नसल्याने या चित्रपटाची फारशी क्रेझ नव्हती. पण आमिर खानचा मुलगा व श्रीदेवी यांची मुलगी सिनेमात असल्याने त्याबद्दल चर्चा होत होती.

‘लवयापा’ बॉक्स ऑफिस कलेक्शन

इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कने दिलेल्या रिपोर्ट्सनुसार, ‘लवयापा’ने रिलीजच्या पहिल्या दिवशी फक्त दीड कोटींची कमाई केली आहे. सकाळ व दुपारच्या शोच्या तुलनेत चित्रपटाचा रात्रीचा शो पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकांची संख्या जास्त होती.

‘लवयापा’ चित्रपटाची कथा

‘लवयापा’ सिनेमाची कथा गौरव (जुनैद) आणि बानी (खुशी) भोवती फिरते. दोघे मॉडर्न काळातील प्रेमी असतात. खुशीचे वडील (आशुतोष राणा) त्यांना फोन एक्सचेंज करून त्यांचे प्रेम सिद्ध करण्याचे आव्हान देतात, त्यानंतर या दोघांच्या नात्यात बरेच चढ-उतार येतात; तेच या सिनेमात दाखवण्यात आले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्रीने बिझनेसमनशी केला साखरपुडा, आजपासून लग्नाआधीच्या सेलिब्रेशनला सुरुवात, ‘या’ शहरात होणार लग्न

‘लवयापा’ मधील कलाकार

लवयापाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे तर जुनैद खान आणि खुशी कपूर व्यतिरिक्त ग्रुशा कपूर, युक्तम खोसला, तन्विका परळीकर, किकू शारदा, देवीशी मदान, आदित्य कुलश्रेष्ठ, निखिल मेहता, जेसन थम, युनूस खान आणि कुंज आनंद यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

Junaid khan khushi kapoor
खुशी कपूर व जुनैद खान (फोटो – इन्स्टाग्राम)

खुशी व जुनैद यांच्याबद्दल बोलायचे झाल्यास दोघांचाही ‘लवयापा’ हा दुसरा चित्रपट आहे. जुनैदचा पहिला चित्रपट ‘महाराज’ होता. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शालिनी पांडे, शर्वरी वाघ, जयदीप अहलावत यांच्या भूमिका होत्या. या चित्रपटातील अभिनयासाठी जुनैदचं कौतुक झालं होतं. तर खुशीने झोया अख्तरच्या ‘आर्चीज’मधून पदार्पण केलं होतं. यात सुहाना खान, वेदांग रैना, अगस्त्य नंदा हे स्टारकिड्सही होते. हा चित्रपटही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता.

Story img Loader