बॉलीवूडमध्ये ९० च्या दशकात सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार यांच्याबरोबर काही आघाडीचे कलाकार होते, जे तेव्हा खूप गाजले. त्यांनी हिट सिनेमे दिले, पण नंतर ते इंडस्ट्रीतून गायब झाले. असाच एक अभिनेता होता, त्याला कलेक्टर व्हायचं होतं. पण तो अभिनेता झाला. मात्र नियतीचा काहीतरी वेगळंच मंजूर होतं. त्याचा एक अपघात झाला आणि एकेकाळी इंडस्ट्री गाजवणारा अभिनेता या क्षेत्रापासून दुरावला. या अभिनेत्याचं नाव म्हणजे चंद्रचूड सिंह होय.
चंद्रचूड सिंह हा ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने ‘माचिस’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले. तो खूप सुंदर दिसायचा आणि त्याच्या डोळ्यांचे तर लोक चाहते होते. मात्र नंतर त्याच्यासोबत अचानक असं काही घडलं की तो इंडस्ट्रीतून गायब झाला. अनेक वर्षांनंतर जेव्हा चंद्रचूड पडद्यावर परतला तेव्हा लोकांना त्याला ओळखणं कठीण झालं होतं.
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मुलाने लोणावळ्यात बांधली लग्नगाठ, फोटो पाहिलेत का?
चंद्रचूड सिंहची गणना बॉलीवूडमधील सर्वात सुशिक्षित स्टार्समध्ये केली जाते. एकेकाळी आयएएस अधिकारी व्हायचे त्याचे स्वप्न होते. पण, अभिनयक्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी त्याने यूपीएससीची तयारी सोडून दिली. त्याला अभिनयक्षेत्रात यश आलं मात्र जेव्हा तो त्याच्या करिअरच्या शिखरावर होता, तेव्हा त्याचा एक अपघात झाला आणि त्या अपघाताने त्याचे संपूर्ण आयुष्यच बदलून टाकले. या अपघाताचा परिणाम त्याच्या आयुष्यावर वर्षानुवर्षे राहिला.
Video: ५८ वर्षीय अभिनेत्याने दुसऱ्यांदा केलं लग्न, आईसह त्याचा १६ वर्षांचा मुलगाही होता उपस्थित
चंद्रचूड सिंहने आपल्या फिल्मी करिअरमध्ये ‘माचिस’, ‘जोश’, ‘दिल क्या करे’, ‘दाग: द फायर’, ‘सिलसिला है प्यार का’, ‘क्या कहना’, ‘आमदनी अठन्नी खर्चा रुपैया’ आणि ‘जिल्हा गाझियाबाद’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. पण, अपघातानंतर तो चित्रपटांपासून दूर झाला. तो निवडक चित्रपट करायचा हेही एक कारण होतं. चांगले कथानक असलेले चित्रपट मिळतील, या आशेने त्याने अनेक चित्रपट नाकारले होते.
सैफ अली खानने १२ वर्षांनी मोठ्या अमृता सिंहशी गुपचूप केलेलं लग्न; आई शर्मिला टागोर यांना कळताच…
एकदा ‘पिंकविला’शी बोलताना चंद्रचूड सिंहने अपघाताबद्दल सांगितलं होतं. गोव्यात वॉटर स्कीइंग करताना खांद्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यावेळी तो अनेक चित्रपटांमध्ये काम करत होते आणि दुखापतीमुळे त्यांच्या चित्रपटांचे शूटिंग थांबले. यादरम्यान त्याने फिजिओथेरपीही करून घेतली आणि शस्त्रक्रियाही केली, परंतु त्याचा फायदा झाला नाही. याचा त्याच्या करिअरवर मोठा परिणाम झाला. यानंतर तो १० वर्षे काम करू शकला नाही, पण त्याने हार मानली नाही, त्याने २०१२ मध्ये ‘चार दिन की चांदनी’ या चित्रपटातून कमबॅक केलं, पण त्याला यश मिळालं नाही.
‘या’ अभिनेत्रीने करिअरमध्ये केले फक्त ७ सिनेमे; सुपरस्टारशी लग्न, मुलीचा जन्म अन् ९ वर्षांनी घेतलेला जगाचा निरोप
आठ वर्षांनी २०२० मध्ये चंद्रचूड सिंहने सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या ‘आर्या’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुनरागमन केले होते. या वेब सीरिजमध्ये त्याचा बदललेला लूक पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. एकेकाळी आपल्या डोळ्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारा आणि तरुणींच्या गळ्यातील ताईत असलेला हाच तो अभिनेता आहे, यावर प्रेक्षकांचा विश्वास बसत नव्हता. चंद्रचूड ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेता होता.