Madhuri Dixit : जिचा अभिनय, जिचं नृत्य आणि जिचं हास्य पाहून लाखो लोक घायाळ होतात अशी बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री माधुरी दीक्षित १९९९ मध्ये विवाहबंधनात अडकली. ‘तेजाब’, ‘खलनायक’, ‘देवदास’, ‘दिल तो पागल हैं’, ‘हम आपके है कौन’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम करून माधुरी संपूर्ण बॉलीवूडची धकधक गर्ल झाली. बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ रोजी डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. आज अभिनेत्री तिच्या लग्नाचा २५ वा वाढदिवस साजरा करत आहे.

माधुरी ( Madhuri Dixit ) सोशल मीडियावर नेहमी तिच्या कुटुंबाबद्दलच्या अनेक गोष्टी शेअर करत असते. याशिवाय डॉ. नेने देखील इन्स्टाग्रामवर सक्रिय आहेत. आरोग्यासंदर्भातील टिप्स, जेवणाचे विविध पदार्थ आरोग्याच्या दृष्टीकोनातून कसे बनवायचे याचे व्हिडीओ डॉ. नेने शेअर करत असतात. आज या जोडप्याच्या सुखी संसाराला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने दोघांनी रोमँटिक पोस्ट शेअर करत एकमेकांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
kranti redkar shares special post for husband sameer wankhede
“२७ वर्षांपूर्वी त्यांना पहिल्यांदा पाहिलं…”, क्रांती रेडकर अन् समीर वानखेडेंच्या लग्नाला ८ वर्षे पूर्ण, दोघांची पहिली भेट कुठे झाली?
siddharth chandekar
सिद्धार्थ चांदेकर-मिताली मयेकरचं लग्नादिवशीच झालेलं मोठं भांडण; अभिनेता किस्सा सांगत म्हणाला, “पहाटे साडेतीन वाजता …”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

हेही वाचा : सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडची थेट लॉरेन्स बिश्नोईसाठी पोस्ट; म्हणाली, “तुझ्याशी झूम कॉलवर बोलायचंय…”

माधुरी दीक्षितच्या पतीची पोस्ट

माधुरीचे ( Madhuri Dixit ) पती डॉ. नेने लिहितात, “दोन हृदयं जी कायम एकत्र असतात. माझी सोबती, माझी प्रियकर तुला २५ व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा! माझ्यासाठी तू या ग्रहावरची सर्वात सुंदर स्त्री आहेस. तुझं मन खूप मोठं आहे आणि तुझं स्मितहास्य खूपच सुंदर आहे. आता जवळपास अर्ध आयुष्य आपण एकत्र काढलंय. आपल्या आयुष्यातील ही सगळी वर्षं खूपच सुंदर होती. मुलांना एकत्र वाढवणं…एकत्र मजा करणं सगळं काही सुंदर आहे. आता इथून पुढे एकमेकांना अशीच कायमस्वरुपी साथ देऊयात.”

डॉ. नेनेंनी या पोस्टसह एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एका कार्यक्रमात डॉ. नेने माधुरीला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. तर, दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये दोघंही रोमँटिक डान्स करत असल्याचं पाहायला मिळतं. या व्हिडीओमध्ये त्यांनी अनेक जुने फोटो देखील शेअर केले आहेत.

हेही वाचा : ४ वर्षांनी भारतात परतणारी मृणाल दुसानिस सुरू करणार स्वत:चा व्यवसाय? ‘त्या’ व्हिडीओमुळे चर्चांना उधाण, नेटकरी म्हणाले…

दरम्यान, या जोडप्यावर लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. लग्नानंतर अनेक वर्ष माधुरी ( Madhuri Dixit ) ग्लॅमर विश्वापासून दूर होती. या जोडप्याला आता अरिन आणि रयान अशी दोन मुलं आहेत. काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं आणि ती मनोरंजनविश्वात सक्रिय झाली. आता लवकरच माधुरी ‘भुल भुलैय्या ३’ मध्ये झळकणार आहे.

Story img Loader