माधुरी दीक्षित, शाहरुख खान आणि करिश्मा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दिल तो पागल हैं’ चित्रपट १९९७ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने घराघरांत एक वेगळीच जादू निर्माण केली होती. याचं कारण म्हणजे चित्रपटातील प्रत्येक गाणं सुपरहिट ठरलं. ‘दिल तो पागल हैं’ मधील सदाबहार गाण्यांनी आजही प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
माधुरी दीक्षित सध्या ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमात परीक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे. नुकतीच या कार्यक्रमात एव्हरग्रीन करिश्मा कपूरने उपस्थिती लावली होती. माधुरी आणि करिश्मा पुन्हा एकदा एकाच रंगमंचावर आल्याने प्रेक्षकांच्या मनात ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटादरम्यानच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
माधुरी आणि करिश्माने मिळून ‘दिल तो पागल हैं’ मधील डान्स फेस ऑफ पुन्हा एकदा रिक्रिएट केला. तर, या दोघी २७ वर्षांनी पुन्हा एकदा “चाक धूम धूम…” गाण्यावर थिरकल्या. माधुरी-करिश्माचा हा जबरदस्त डान्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. परंतु, हा डान्स पाहून नेटकरी शाहरुख खानला मिस करत आहेत.
हेही वाचा : Video: ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेता चेतन वडनेरेचा ‘असा’ पार पडला हळदी सोहळा, पाहा खास क्षण
‘चाक धूम धूम’ गाणं हे शाहरुख, माधुरी आणि करिश्मावर चित्रित झालं आहे. त्यामुळे आता या दोघींच्या जोडीला शाहरुख असता तर, २७ वर्षांनी खूपच सुंदर रियुनियन झालं असतं असं नेटकऱ्यांनी कमेंट्स सेक्शनमध्ये म्हटलं आहे.
हेही वाचा : मराठी साहित्यातलं मानाचं पान ‘फकिरा’ रुपेरी पडद्यावर
दरम्यान, करिश्मा-माधुरीच्या डान्सवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून अवघ्या एक दिवसात याला ११ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.