‘दिल तो पागल हैं’ या १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात शाहरुख खान, माधुरी दीक्षित व करिश्मा कपूर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाचं कथानक, गाणी अगदी सगळं काही लक्षवेधी होतं. परंतु, या सगळ्यात आजही लक्षात आहे तो म्हणजे दोन्ही प्रमुख अभिनेत्रींनी एकत्र केलेला जबरदस्त डान्स. माधुरी आणि करिश्माने प्रचंड मेहनत करून ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटात आपल्या नृत्याची झलक दाखवली होती.

‘दिल तो पागल हैं’मध्ये माधुरी दीक्षितने पूजा तर, करिश्मा कपूरने निशा हे पात्र साकारलं होतं. निशाच्या पायाला दुखापत झाल्यावर राहुल म्हणजेच शाहरुख खान पूजाला लीड डान्सर बनवतो अन् पुढे राहुल-पूजाची लव्हस्टोरी कशी फुलते या गोष्टी प्रेक्षकांना चित्रपटात पाहायला मिळतात. परंतु, यामध्ये पूजा आणि निशाची एका सीनमध्ये डान्सिंग जुगलबंदी पाहायला मिळते. तब्बल २७ वर्षांनी हा सीन प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा : सलील कुलकर्णींच्या लेकाचं पहिलं हिंदी गाणं! २ वर्षांचा असताना गायलेलं ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, शुभंकरसाठी बाबांची खास पोस्ट

माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर यांनी डान्स दीवानेच्या रंगमंचावर ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटातील डान्स फेस ऑफ रिक्रिएट केला. यावेळी माधुरीने पिवळ्या रंगाचा, तर करिश्माने काळ्या रंगाचा भरजरी ड्रेस परिधान केला होता. या दोघींची पुन्हा एकदा तिच एनर्जी पाहून चाहत्यांसह परीक्षकाची भूमिका निभावणारा अभिनेता सुनील शेट्टी थक्क झाला होता.

हेही वाचा : ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्रीचा पार पडला साखरपुडा, शेअर केले खास फोटो

कॉमेडीयन भारती सिंगने सुद्धा माधुरी-करिश्माच्या डान्सचं कौतुक केलं. याचा खास प्रोमो कलर्स वाहिनीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “आम्हाला हेच रियुनियन एवढे दिवस बघायचं होतं”, “दोघीही जबरदस्त नाचल्या आहेत”, “पूजा आणि निशा पुन्हा एकत्र” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

Story img Loader