Bhool Bhulaiyaa 3: हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया ३’ची क्रेझ सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात कार्तिक आर्यनसह तीन लोकप्रिय अभिनेत्री पाहायला मिळणार आहेत. अभिनेत्री माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ), विद्या बालन आणि तृप्ती डिमरी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. शिवाय राजपाल यादव, संजय मिश्रा आणि विजय राजदेखील दिसणार आहे. सध्या ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच जोरदार प्रमोशन सुरू आहे.

नुकतंच ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ) लखनऊला पोहोचले होते. यावेळी एका मॉलमध्ये दोघं ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसले. यादरम्यान चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. यामधील माधुरी दीक्षित आणि कार्तिक आर्यनच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.

हेही वाचा – Video: सासुरवाडीत झाली गडबड, सूर्या आणि डॅडी प्यायले भांग अन् मग…; ‘लाखात एक आमचा दादा’ मालिकेत नेमकं काय घडलं? वाचा

‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या लखनऊमधील प्रमोशनच्यावेळी माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ) आणि कार्तिक आर्यनने ‘आमी जे तोमार 3.0’, ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या शीर्षकगीतावर जबरदस्त डान्स केला. याचे व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

हेही वाचा – फुलेरामध्ये पुन्हा होणार ‘पंचायत’, चौथ्या सीझनच्या चित्रीकरणाला सुरुवात; जाणून घ्या काय असणार कथा अन् कधी होणार प्रदर्शित

हेही वाचा – Video: “लवकर लग्न करा”, ‘बिग बॉस मराठी’ फेम वैभव चव्हाण आणि इरिनाच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्हाला वहिनी हिच पाहिजे”

दरम्यान, ‘भूल भुलैया ३’ चित्रपटाच्या अ‍ॅडवान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे. प्रदर्शनापूर्वीच या अ‍ॅडवान्स बुकिंगमधून या चित्रपटाने लाखो रुपये कमावले आहे. पण, बॉक्स ऑफिसवर ‘भूल भुलैया ३’ आणि ‘सिंघम अगेन’ चित्रपटात मोठी टक्क होणार आहे. ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचेदेखील अ‍ॅडवान्स बुकिंग सुरू झाले असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. अजय देवगण, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, करीना कपूर, टायगर श्रॉफ, अक्षय कुमार आणि अर्जुन कपूर ‘सिंघम अनेग’मध्ये झळकणार आहेत. त्यामुळे आता बॉक्स ऑफिसवर कोणता चित्रपट धुमाकूळ घालणार? हे येत्या काळात पाहायला मिळणार आहे.