कलाकार मंडळींचं अफेअर, रिलेशनशिप, वैवाहिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरतं. बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींचंही खासगी आयुष्य कोणापासून लपून राहिलेलं नाही. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे माधुरी दीक्षित. डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्न करण्यापूर्वी माधुरीचं नाव काही व्यक्तींशी जोडलं गेलं. त्यातीलच एक नाव म्हणजे क्रिकेटपटू अजय जडेजा. माधुरी व अजय दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते.

आणखी वाचा – Video : निक जोनसवर चाहतीनं फेकलं अंतर्वस्त्र, प्रियांका चोप्रानं असं काही केलं की…; व्हिडीओ व्हायरल

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
vidarbha parties prahar janshakti vanchit bahujan aghadi
लोकजागर : वैदर्भीय पक्षांची ‘वंचना’
Alzarri Joseph fined by ICC for abusing fourth umpire in WI-BAN ODI Month after two-match ban for on-field tiff
Alzarri Joseph: अल्झारी जोसेफला दोन सामन्यांच्या बंदीनंतर ICC ने ठोठावला दंड, पंचांना केली होती शिवीगाळ
George Linde Misses Team Bus But leads South Africa to Thrilling Win by Career Best All Rounder Performance SA vs PAK
PAK vs SA: आधी टीम बस चुकली, नंतर पोलिसांच्या गाडीतून पोहोचला मैदानात अन् पाकिस्तानला नमवत जिंकला सामनावीराचा पुरस्कार
IND vs AUS Srikkanth Blasts at Mohammed Siraj for Travis Head Send off Said Don't You Have brains
IND vs AUS: “सिराज वेडा आहेस का तू?…”, भारताचे माजी क्रिकेटपटू मोहम्मद सिराजवर संतापले, हेडच्या वादावर केलं मोठं वक्तव्य
ICC Banned National Cricket League USA
एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन

एका मासिकाच्या फोटोशूटदरम्यान माधुरी व अजय यांच्यामध्ये मैत्री झाली. त्यानंतर दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं. या दोघांच्या मैत्रीचं प्रेमामध्ये रुपांतर झालं. नव्वदच्या दशकामध्ये माधुरी व अजयच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चाही रंगल्या. त्यावेळी अजय सर्वाधिक चर्चेत असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक होते.

आणखी वाचा – “लोन, डाउन पेमेंट, खर्च अन्…” वर्षभरापूर्वी मुंबईमध्ये घर खरेदी केल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट, म्हणाला, “भीती होती पण…”

अजय यांची लोकप्रियता असताना दुसरीकडे माधुरीचाही ‘दिल तो पागल है’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. तिचा हा चित्रपटही सुपरहिट ठरला. माधुरी व अजय यांचं करिअर सुरळीत सुरू असताना कुटुंबियांमुळे दोघंही एकमेकांपासून दूर झाले. अजयच्या कुटुंबियांचा या नात्याला विरोध होता. एबीपी न्यूजच्या वृत्तानुसार माधुरीचे कुटुंबीय तसेच अभिनयक्षेत्रामधील मुलगी असल्याने त्यांना हे नातं मान्य नव्हतं.

आणखी वाचा – दोन लग्न, दोन्ही वेळा घटस्फोट; ४५ वर्षीय सुप्रसिद्ध अभिनेत्री शोधतेय तिसरा जोडीदार, एकटीच करते मुलांचा सांभाळ, म्हणाली, “कधीतरी…”

शिवाय माधुरीबरोबर असताना काही दिवसांनंतर अजय यांच्या करिअरमध्येही बरेच चढ-उतार आले. १९९९ नंतर माधुरी व अजय यांच्या नात्यामध्ये फुट पडली. यामागंच कारण म्हणजे मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये अजय अडकला. त्यानंतर माधुरीने अशा मुलाशी लग्न करु नये असं तिच्या आई-वडिलांना वाटू लागलं. त्यानंतर माधुरीही अमेरिका येथे निघून गेली. तिथेच माधुरी व श्रीराम नेने यांची भेट झाली. ऑक्टोबर १९९९मध्ये माधुरीने श्रीराम यांच्याशी लग्न केलं. तर अजय २०००मध्ये विवाहबंधनात अडकला.

Story img Loader