Madhuri Dixit Dance : १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून माधुरी दीक्षितने सिनेविश्वात पदार्पण केलं. १० ऑगस्ट रोजी माधुरीच्या मनोरंजन विश्वातील प्रवासाला ४० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्ताने बॉलीवूडची ही ‘धकधक गर्ल’ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. माधुरीच्या चाहत्यांसाठी याठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. यादरम्यानचा नुकताच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
माधुरीने ( Madhuri Dixit ) ‘अबोध’ चित्रपटातून पदार्पण केलं असलं तरीही, तिला खरी ओळख ‘तेजाब’मुळे मिळाली. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तेजाब’ चित्रपटात माधुरीसह अनिल कपूर, चंकी पांडे, अनुपम खेर, सुरेश ओबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘तेजाब’मधलं प्रत्येक गाणं सोशल मीडियावर सुपरहिट ठरलं होतं. यापैकी ‘एक दो तीन…’ हे एव्हरग्रीन गाणं आजही प्रचंड लोकप्रिय आहे. प्रत्येक समारंभात हे गाणं वाजवलं जातं. माधुरीने या ३६ वर्षांपूर्वीच्या लोकप्रिय गाण्यावर पुन्हा एकदा जबरदस्त डान्स केला आहे.
हेही वाचा : न हसता व्हिडीओ बघा! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या कलाकारांनी दिलं चॅलेंज; नेटकरी म्हणाले, “तुम्ही सगळे एकत्र…”
माधुरी दीक्षितचा जबरदस्त डान्स
माधुरी दीक्षितचा व्हिडीओ ‘विरल भय्यानी’ या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. अभिनेत्रीच्या सिनेकारर्किदीला ४० वर्षे पूर्ण झाल्याने अमेरिकेत ‘हूक स्टेप विथ माधुरी’ या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अभिनेत्रीने तिच्या गाजलेल्या गाण्यांच्या हूकस्टेप्स करून दाखवल्या. याशिवाय माधुरी तिच्या चाहत्यांसमोर ‘एक दो तीन…’ गाण्यावर थिरकली.
माधुरीने ( Madhuri Dixit ) USA दौरा करण्याआधी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी अभिनेत्रीला “डॉ. श्रीराम नेने यांच्याशी संवाद साधताना कधी बॉलीवूड चित्रपटातील गाणी, संवादांचा वापर केलाय का?” असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी माधुरीने दिलखुलासपणे उत्तर देत “माझ्या नवऱ्याला हिंदी येत नाही, तो मराठी छान बोलतो” असं सांगितलं होतं.

माधुरीच्या या डान्स व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. वयाच्या ५७ व्या वर्षी देखील तिचा फिटनेस थक्क करणार आहे. त्यामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसह नेटकऱ्यांनी सुद्धा या धकधक गर्लच कौतुक केलं आहे.