Madhuri Dixit Dance Video : अलीकडच्या काळात चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्यामधील विविध गाणी सोशल मीडियावर व्हायरल होतात. अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ चित्रपटाची सध्या सर्वत्र अशीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाचा पहिला भाग २०२१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता पुष्पा अन् श्रीवल्लीची जोडी पुन्हा एकदा बॉक्स ऑफिस गाजवायला सज्ज झाली आहे. सध्या या चित्रपटातील ‘सूसेकी’ गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या गाण्यावर बॉलीवूड सेलिब्रिटींसह अनेक मराठी कलाकार गेल्या काही दिवसांमध्ये थिरकल्याचं पाहायला मिळालं. आता बॉलीवूडच्या ‘धकधक गर्ल’ला सुद्धा या गाण्याची भुरळ पडली आहे.

बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. तिचं हास्य, नृत्य आणि दमदार अभिनयामुळे माधुरीने तिच्या चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ९० च्या दशकात ‘तेजाब’, ‘खलनायक’, ‘राम लखन’, ‘दिल तो पागल हैं’, ‘हम आपके है कौन’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांमध्ये माधुरीने काम केलेलं आहे. तिने नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

anant ambani and Radhika merchant dance at best friend sangeet ceremony video viral
Video: “अनारकली डिस्को चली…”, मुकेश अंबानींच्या धाकट्या सूनेचा मैत्रिणींसह जबरदस्त डान्स, तर अनंत अंबानी थिरकला ‘या’ गाण्यावर
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Vicky Kaushal Viral Video
Video : विकी कौशलने जिममध्ये अजय-अतुलच्या ‘या’ मराठी गाण्यावर धरला ठेका; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Priyanka Chopra adorable gesture for bhabhi video viral
Video: नणंद असावी तर अशी! भावाच्या संगीत सोहळ्यात प्रियांका चोप्राच्या ‘त्या’ कृतीचं होतंय कौतुक
Priyanka Chopra Dance Video
Video : भावाच्या हळदीत देसी गर्लने शाहरुख खानच्या गाण्यावर लगावले ठुमके; पाहा डान्सचा व्हिडीओ
Bigg Boss Marathi Fame Yogita Chavan Dance on uyi amma song
Video: योगिता चव्हाणने पुन्हा एकदा एक्सप्रेशनने जिंकली चाहत्यांची मनं, अभिनेत्रीने Uyi Amma गाण्यावर केला जबरदस्त डान्स
udit narayan lip kiss with fan in live show video viral
Video: ‘टिप टिप बरसा पानी’ गाताना उदित नारायण यांनी महिला चाहत्यांना केलं किस, Lip Kiss चा व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी
Maharashtrachi Hasyajatra Fame shivali Parab dance on uyi amma song
Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परबचा Uyi Amma गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी कौतुक करत म्हणाले…

हेही वाचा : Tisha Kumar: चार दिवसांनी तिशा कुमारवर अंत्यसंस्कार, आई-वडिलांना अश्रू अनावर; रितेश देशमुखने वाहिली श्रद्धांजली

माधुरी दीक्षितचा सुंदर डान्स पाहिलात का? (Madhuri Dixit)

माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) नुकताच ‘पुष्पा २’ चित्रपटातील ‘सूसेकी’ गाण्यावर डान्स केला. या गाण्यात भन्नाट ट्विस्ट आहे तो म्हणजे ‘पुष्पा २’मधील सूसेकी आणि “एक लाजरान साजरा मुखडा” या गाण्याच्या मराठमोळ्या रिमिक्स व्हर्जनवर माधुरी थिरकली आहे. हिंदी गाण्यावर माधुरीचा मराठमोळा तडका पाहून नेटकऱ्यांनी लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

माधुरी दीक्षितच्या या व्हिडीओवर अवघ्या २४ तासांत ७० लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. धकधक गर्लच्या या दिलखेचक अदा पाहून चाहत्यांनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

हेही वाचा : Chhaya Kadam यांची निर्मिती असलेल्या ‘बारदोवी’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, अंगावर काटा आणणारा थरार

pushpa 2
अल्लू अर्जुनचा पुष्पा २

हेही वाचा : “हिंदी चित्रपटात काम करण्यासाठी मला कधी…”, २१ वर्षांपासून सिनेसृष्टीत असलेल्या नेहा धुपियाला अजूनही करावा लागतोय संघर्ष

दरम्यान, ‘पुष्पा २’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर अल्लू अर्जुन व रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट सुरुवातीला ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार होता. परंतु, आता काही कारणास्तव या चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल करण्यात आला आहे. आता ‘पुष्पा २’ ६ डिसेंबर २०२४ मध्ये प्रदर्शित होईल.

Story img Loader