‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ या लोकप्रिय गाण्यावर थिरकल्याशिवाय होळीचा सण पूर्ण होत नाही. रंगपंचमीच्या दिवशी जागोजागी अमिताभ बच्चन यांचं हे लोकप्रिय गाणं वाजवलं जातं. हे गाणं १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिलसिला’ चित्रपटातील आहे. या गाण्याने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. त्यामुळे ऐन होळी सणाच्या दिवशी धकधक गर्लला सुद्धा या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधुरी दीक्षितने शेअर केलेल्या व्हिडीओची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. अभिनेत्री सध्या डान्स दीवाने कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. त्यामुळे याच सेटवर माधुरीने स्पर्धकांसह या सदाबहार गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. “आमच्या डान्स दीवानेच्या कुटुंबाकडून तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा” असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे.

हेही वाचा : लग्नानंतरचा पहिला सण! पूजा सावंतने सासरी ‘अशी’ साजरी केली धुळवड; ऑस्ट्रेलियातील फोटो आले समोर

‘रंग बरसे भीगे चुनरवाली’ या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ माधुरीने रंगपंचमीच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : Video : कुशल बद्रिकेच्या पत्नीने पेटत्या होळीतून काढला नारळ; अभिनेता म्हणाला, “बालपणाच्या खोड्या…”

दरम्यान, माधुरीचं रील पाहताच चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “डान्सर क्वीन”, “मॅम अप्रतिम डान्स” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. याशिवाय व्हिडीओ शेअर केल्यावर अवघ्या काही तासांच्या आत या व्हिडीओला ३ लाखांहून अधिक व्ह्यूज, तर तब्बल १५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit dances on amitabh bachchan rang barse song with her dance deewane family video viral sva 00