‘तेजाब’, ‘दिल तो पागल हैं’ अशा एकापेक्षा एक लोकप्रिय चित्रपटांमधून माधुरी दीक्षितने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. ९० च्या दशकात या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलीवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. सध्या अभिनेत्री ‘डान्स दिवाने’ कार्यक्रमात परीक्षकाची जबाबादारी निभावत आहे.
माधुरीच्या अभिनयाप्रमाणे नृत्य कौशल्याची देखील सर्वत्र चर्चा असते. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यामध्ये माधुरी एका लोकप्रिय मराठी गाण्यावर थिरकत असल्याचं पाहायला मिळत आहे.
हेही वाचा : “खोटी आणि अर्थहीन…”, साखरपुड्याच्या व्हायरल बातमीवर बबिता आणि टप्पूने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
“गुलाबी साडी आणि लाली लाल लाल…” हे गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संजू राठोड यांनी हे गाणं लिहिलं असून त्यांच्याच आवाजात संगीतबद्ध करण्यात आलं आहे. मराठी कलाविश्वापासून ते अगदी बॉलीवूडपर्यंत प्रत्येकाला या गाण्याची भुरळ पडली आहे.
हेही वाचा : उषा मंगेशकरांना ‘झी मराठी’चा ‘जीवन गौरव’, तर ‘मराठी पाऊल पडते पुढे’ पुरस्कारावर ‘या’ अभिनेत्रीने कोरलं नाव
माधुरी दीक्षितने लाल रंगाचा सुंदर असा लेहेंगा परिधान करून या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. अभिनेत्रीच्या दिलखेचक अदा पाहून तिचे सगळेच चाहते घायाळ झाल्याचं कमेंट्मध्ये पाहायला मिळत आहे. माधुरीच्या व्हिडीओवर सेलिब्रिटींसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. अवघ्या काही तासांतच तिच्या व्हिडीओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.