Madhuri Dixit : ९० च्या दशकात रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी सुपरस्टार अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. मराठमोळ्या ‘धकधक गर्ल’चे चाहते केवळ भारतातच नाहीतर जगभरात आहेत. माधुरी सुंदर अभिनेत्री आहेच पण, याशिवाय इंडस्ट्रीत तिला उत्तम नृत्यांगणा म्हणून देखील ओळखलं जातं. आजवर अनेक चित्रपटांमध्ये माधुरीने डान्स फेस ऑफचे दमदार सीन्स केले आहेत.

‘दिल तो पागल है’ ( माधुरी-करिश्मा ), देवदास ( माधुरी -ऐश्वर्या ), भूल भुलैय्या ( माधुरी-विद्या बालन ) या तिन्ही चित्रपटांमधली माधुरीची डान्स जुगलबंदी सोशल मीडियावर तुफान हिट ठरलीये. आजही व्यग्र शेड्युमधून वेळ मिळाला की, माधुरी आपल्या डान्सची आवड जोपासताना दिसते. अलीकडेच ‘धकधक गर्ल’ने शेअर केलेला एक डान्स व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आला आहे.

माधुरी दीक्षितने या व्हिडीओमध्ये ५७ वर्षांपूर्वीच्या एव्हरग्रीन बॉलीवूड गाण्यावर डान्स केला आहे. या डान्ससाठी अभिनेत्रीने खास रेट्रो लूक केला होता. गळ्यात मोत्यांचा हार, रेट्रो लूक हेअरस्टाइल, वेलवेट साडी अन् त्यावर भरजरी पदर या लूकमध्ये माधुरी खूपच सुंदर दिसत होती. याच रेट्रो लूकमध्ये अभिनेत्रीने सुंदर डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

“उनसे मिली नज़र के मेरे होश उड़ गये…” असे या गाण्याचे बोल आहेत. सध्या हे गाणं सोशल मीडियावर तुफान ट्रेंड होत आहे. हे गाणं ५७ वर्षे जुन्या ‘झुक गया आसमान’ (१९६८) या सिनेमातलं आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांनी या सदाबहार गाण्याला आपला आवाज दिला होता. याच एव्हरग्रीन गाण्यावर माधुरीने सुंदर असा डान्स केला आहे.

माधुरीने या डान्स व्हिडीओला, “Retro Vibes For The Win” असं कॅप्शन दिलं आहे. डान्स करताना माधुरीच्या चेहऱ्यावरच्या दिलखेचक अदांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. अभिनेत्रीच्या या डान्स व्हिडीओवर एक दिवसांच्या आत तब्बल २८ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहे.

दरम्यान, माधुरीने डान्स केलेल्या रील व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. “माधुरी मॅमला डान्स करताना पाहणं ही पर्वणी आहे”, “मॅजिक”, “ट्रेंडिंग गाण्यावरचं बेस्ट रील”, “सुपर सुपर सुपर स्टार”, “रिअल क्वीन”, “सुंदर…Queen”, “सुंदर डान्स” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी धकधक गर्लच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

Story img Loader