बॉलीवूडची धकधक गर्ल म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. ‘तेजाब’, ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’, ‘कोयला’, ‘खलनायक’ अशा एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपटांमध्ये अभिनेत्रीने भूमिका साकारल्या आहेत. येत्या १५ मे रोजी माधुरी तिचा ५७ वा वाढदिवस साजरा करणार आहे. यानिमित्ताने ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमात खास आयोजन करण्यात आलं होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री आहेच पण, तिच्या नृत्याचे देखील लाखो चाहते आहेत. सध्या ती ‘डान्स दीवाने’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. या शोमध्ये दर आठवड्यात स्पर्धक वेगवेगळ्या थीमवर त्यांचे डान्स परफॉर्मन्स सादर करतात. परंतु, यंदाची थीम काहीशी खास आहे कारण, माधुरीच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमात खास आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’मुळे अमितला मिळाले तब्बल ‘एवढे’ पुरस्कार, नेटकऱ्यांकडून कमेंट्सचा पाऊस; म्हणाले, “अर्जुन सुभेदार…”

‘डान्स दीवाने’मध्ये यावेळी अंकिता लोखंडे खास उपस्थिती लावणार आहे. धकधक गर्लला इम्प्रेस करण्यासाठी अंकिता खास “हमको आज कल है इंतजार” या गाण्यातील माधुरीचा लूक रिक्रिएट करून डान्स करणार आहे. ‘कलर्स वाहिनी’ने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये याची झलक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : श्रीदेवी यांच्या स्मरणार्थ मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; लोखंडवाला कॉम्प्लेक्सच्या जंक्शनला देणार दिवंगत अभिनेत्रीचं नाव

माधुरी दीक्षित आणि अंकिता लोखंडेचा एकत्र डान्स

माधुरी आणि अंकिता दोघी मिळून यावेळी ‘मैं कोल्हापूर से आयी हूँ’ या आयकॉनिक गाण्यावर थिरकल्या. या दोघींचा भन्नाट डान्स पाहून नेटकरी आनंद व्यक्त करत आहेत. प्रत्येकजण हा खास एपिसोड पाहण्यासाठी उत्साही असल्याचं सांगत आहे. अंकिता यावेळी माधुरीला सांगते, “मॅम तुमची मी खूप मोठा चाहती आहे आणि मी कायम, आयुष्यभर तुमची चाहती राहणार आहे.” याशिवाय माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने हे सुद्धा या कार्यक्रमात पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहेत. डॉ. नेने आणि माधुरी मिळून एका रोमँटिक गाण्यावर कपल डान्स करणार आहेत. त्यामुळे यंदाच्या आठड्यातील एपिसोड पाहण्यासाठी सगळेच प्रेक्षक उत्सुक झाले आहेत.

हेही वाचा : ‘भैय्याजी’ आहे तरी कोण? मनोज बाजपेयींच्या १०० व्या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित! बिहारमध्ये होणार जबरदस्त अ‍ॅक्शन

अंकिताचं हे बोलणं ऐकून माधुरी सुद्धा भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. मंचावर येऊन तिने अंकिताला मिठी मारत जवळ घेतलं आणि तिच्या डान्स परफॉर्मन्सचं भरभरून कौतुक केलं. सध्या माधुरी आणि अंकिता मंचावर एकत्र थिरकल्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit dances with ankita lokhande on iconic song of 90s watch promo sva 00