Madhuri Dixit : माधुरी दीक्षित उत्तम अभिनेत्री आहेच पण, अभिनयाच्या जोडीला ‘धकधक गर्ल’ तिच्या नृत्याविष्कारासाठी देखील ओळखली जाते. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये माधुरीने ‘डान्स फेस ऑफ’ सीन्स परफॉर्म केल्याचं पाहायला मिळालं आहे. ऐश्वर्या-माधुरी यांचं ‘डोला रे डोला’, करिश्मा-माधुरीची ‘दिल तो पागल हैं’ मधील जुगलबंदी ते नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘भुल भुलैय्या ३’ मधला विद्या-माधुरीचा नृत्याविष्कार सर्वांसाठी लक्षवेधी ठरला. माधुरीच्या डान्सचे लाखो लोक चाहते आहेत. नुकत्याच पार पडलेल्या IIFA पुरस्कार सोहळ्यात प्रेक्षकांना पुन्हा एकदा माधुरीच्या डान्सची जादू अनुभवायला मिळाली.

माधुरी दीक्षितला ९० च्या दशकातील ‘लेडी सुपरस्टार’ म्हणून ओळखलं जातं. तिने अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. एवढंच नव्हे तर अनेक प्रसिद्ध गाणी ‘धकधक गर्ल’वर चित्रित करण्यात आली आहेत. नुकत्याच पार पडलेल्या ‘आयफा पुरस्कार’ सोहळ्यात माधुरीने तिच्या जुन्या लोकप्रिय गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं.

१९९३ मध्ये ‘खलनायक’ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात संजय दत्त, जॅकी श्रॉफ आणि माधुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या मधलं लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं ‘चोली के पीछे क्या है’ हे गाणं आजही सर्वत्र लोकप्रिय आहे. सिनेमात या गाण्यावर माधुरीने जबरदस्त डान्स केला होता. हे गाणं इला अरुण आणि अलका याग्निक यांनी गायलं होतं. या गाण्याची क्रेझ आज ३२ वर्षांनंतरही कायम आहे.

माधुरीचा जबरदस्त डान्स पाहिलात का?

आयफा पुरस्कार सोहळ्यात माधुरीने लाल रंगाची घागरा-चोली घालून ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं. ५७ व्या वर्षी धकधक गर्लची एनर्जी पाहून सगळेच थक्क झाले होते. माधुरीच्या या डान्स व्हिडीओवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यातील माधुरीचे अनेक रिहर्सल करतानाचे आणि सोहळ्यात डान्स करतानाचे व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहेत.

दरम्यान, याच सोहळ्यात माधुरी आणि शाहरुख खान यांचं डान्स रियुनियन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांची ही लाडकी जोडी ‘दिल तो पागल हैं’ चित्रपटातील गाण्यांवर थिरकणार आहे. माधुरी आणि शाहरुखला एकत्र ‘चाक धूम धूम’ गाण्यावर डान्स करताना पाहून नेटकऱ्यांनी देखील आनंद व्यक्त केला आहे.

Story img Loader