अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडपं. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते व्हिडीओ व फोटो शेअर करत असतात. डॉ. नेनेंनी आता त्यांच्या एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ते दोघेही एड शीरनचं लोकप्रिय गाणं गाताना दिसत आहेत.
डॉ. नेनेंनी इन्स्टाग्रामवर त्यांचा व माधुरीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात माधुरी एड शीरनचं ‘परफेक्ट’ गाणं गाताना दिसते. नंतर डॉ. नेनेही तिच्याबरोबर हे गाणं म्हणतात. ‘आमच्या आवडत्या गाण्यांपैकी एक ‘परफेक्ट’ गाताना नेहमी खूप मजा येते’ असं कॅप्शन डॉ. नेनेंनी या व्हिडीओला दिलं आहे. याचबरोबर त्यांनी एड शीरनला टॅगही केलं आहे.
डॉ. नेने व माधुरीच्या या व्हिडीओवर चाहते लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दोघांनी खूप छान गाणं गायलं, असं चाहते म्हणत आहेत. ‘किती गोड,’ ‘माहित नव्हतं डॉ. नेने इतकं छान गातात’, ‘खूप छान’, ‘गाणं खूप आवडलं’ अशा कमेंट्स या व्हिडीओवर आहेत.
माधुरी दीक्षितच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास जानेवारीमध्ये तिचा मराठी सिनेमा ‘पंचक’ प्रदर्शित झाला होता. माधुरी व डॉ. नेने यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. माधुरी सध्या ‘डान्स दिवाने’ चं परीक्षण करत आहे.