बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने १७ ऑक्टोबर १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर काही काळ माधुरीने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. पुढे, काही वर्षांत नेने कुटुंबीय अमेरिकेहून भारतात परतलं आणि माधुरीने बॉलीवूडमध्ये पुनरागमन केलं. डॉ. नेने यांचे आई-वडील याआधी फारसे कॅमेऱ्यासमोर आले नव्हते. ‘पंचक’ चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्रीच्या सासू-सासऱ्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. याशिवाय डॉ. नेने सोशल मीडियावर त्यांचे अनेक कौटुंबिक फोटो शेअर करत असतात. नुकतीच त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलला आई-बाबांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांचे वडील माधव नेने यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माधुरी दीक्षितचे सासरे म्हणाले, “मी १९६३ ला इंग्लंडला गेलो त्याआधी आम्ही दादरला शिवाजी पार्क परिसरात राहायचो. मला तीन भाऊ आणि एक बहीण… अशी आम्ही पाच भावंडं एकत्र वाढलो. माझं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण दादरच्या छबीलदास शाळेत पूर्ण झालं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षणासाठी मी एल्फिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी मी लोकल ट्रेनने प्रवास करायचो. अर्थात महाविद्यालयात मी असताना प्रचंड अभ्यास केला. माझे दोन्ही काका त्याकाळी उच्चशिक्षित असल्याने त्यांच्याकडे बघून मी माझा शैक्षणिक प्रवास पूर्ण केला.”

हेही वाचा : अखेर मानसी नाईक पतीपासून विभक्त! घटस्फोट होताच व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आता…”

माधव नेने पुढे म्हणाले, “कालांतराने मी पुणे इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. सगळ्या विषयात चांगले गुण असल्याने मला कोणत्याही महाविद्यालयात अगदी सहज प्रवेश मिळाला असता. १९६० मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याच्या पुढचं एक वर्ष मी टाऊन प्लॅनिंग विभागात नोकरी केली. त्यानंतर मी ‘जे.सी.गॅमन कंपनी’मध्ये रुजू झालो कारण, माझं पदवीपर्यंतचं शिक्षण स्थापत्य अभियांत्रिकी विभागात (civil engineering) पूर्ण झालं होतं. हळुहळू मला परदेशातील शिक्षणाचं महत्त्व समजलं. पुढे तीन वर्षे नोकरी करून मी पैसे जमावले आणि इंग्लंड येथील इम्पेरियल महाविद्यालयात शैक्षणिक प्रवेशासाठी अर्ज केला. मोडक म्हणून प्रसिद्ध इंजिनिअर होते त्यांनी मला या संपूर्ण प्रवासात खूप मदत केली.”

हेही वाचा : नांदा सौख्यभरे! तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडके अडकले लग्नबंधनात, थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

“इम्पेरियल कॉलेजमधून तुमचं शिक्षण पूर्ण झालं असेल, तर तुम्हाला सहज नोकरी मिळून जाते. १९६३ ते १९६५ या कालावधीमध्ये मी त्या महाविद्यालयात इंग्लंडमध्ये होतो. त्यानंतर मी फक्त लग्नासाठी इथे परत आलो होतो.” असं माधव नेने यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Madhuri dixit father in law completed higher studies from england imperial college know about him sva 00
Show comments