Madhuri Dixit Husband Dr. Nene Make Mango Sticky Rice : ‘तेजाब’, ‘हम आपके हैं कौन’, ‘राम लखन’, ‘खलनायक’, ‘दिल तो पागल हैं’ अशा बऱ्याच चित्रपटांतून घराघरांत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. दमदार अभिनयाबरोबरच माधुरी उत्तम नृत्यांगणा म्हणून देखील ओळखली जाते. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. माधुरीने करिअरच्या शिखरावर असताना १९९९ मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. डॉ. श्रीराम नेनेंशी अभिनेत्रीने अमेरिकेत लग्नगाठ बांधली. हे जोडपं सोशल मीडियावर कायम सक्रिय असतं. त्यांनी नुकताच शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेत आला आहे.

डॉ. श्रीराम नेने यांचं युट्यूब चॅनेल आहे. यावर ते विविध पाककृती बनवून दाखवत असतात. यापूर्वी पाणीपुरी, मिसळ पाव, पुरणपोळी असे विविध पदार्थ डॉ. नेनेंनी त्यांच्या चाहत्यांना बनवून दाखवले आहेत. आता डॉ. नेनेंनी नुकत्याच शेअर केलेल्या एका नव्या पाककृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
myra vaikul baby brother naming ceremony
Video : मायरा वायकुळच्या लहान भावाच्या बारशाचा राजेशाही थाट! नाव ठेवलंय खूपच खास, अर्थही सांगितला
Lakhat Ek Aamcha Dada
Video: “मी आता तुळजा सूर्यकांत जगताप…”, बाप-लेक समोरासमोर येणार; तुळजा डॅडींना सणसणीत उत्तर देणार, पाहा प्रोमो
tharala tar mag fame chaitanya and kusum dances on tamil song
Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य अन् कुसुमचा तामिळ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकरी म्हणाले, “किती गोड…”
siddharth chandekar took special ukhana for wife mitali
“मितालीचं नाव घेतो अन् गिफ्ट करतो…”, सिद्धार्थ चांदेकरने बायकोसाठी घेतला हटके उखाणा, पाहा व्हिडीओ
punha kartvya aahe
Video : “आपलं लग्न मोडलेलं…”, आकाशने उचलले मोठे पाऊल; ‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत ट्विस्ट; नेटकरी म्हणाले, “आकाश भाऊ संपला विषय”
Reshma Shinde Wedding Video writes special kannda msg
Video : पतीसाठी ‘कन्नड’मध्ये खास मेसेज, मंडपात थाटात एन्ट्री अन्…; रेश्मा शिंदेच्या लग्नात मित्रमंडळींच्या डोळ्यात आनंदाश्रू…

हेही वाचा : Anant – Radhika Wedding Live Updates : अनंत-राधिकाला आशीर्वाद द्यायला पोहोचले शरद पवार, पाहा व्हिडीओ

डॉ. श्रीराम नेनेंनी बनवला मँगो स्टिकी राइस

डॉ. श्रीराम नेनेंनी त्यांच्या लाडक्या मुलाबरोबर मिळून मँगो स्टिकी राइस बनवला आहे. तांदूळ, नारळाचं दूध, गूळ, आंबे वापरून त्यांनी हा चविष्ट राइस बनवला आहे. डॉ. नेनेंना एवढं सगळं जेवण येत असल्याचं पाहून त्यांच्या फॉलोअर्सनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. अनेकांनी कमेंट्समध्ये माधुरीला असं चविष्ट जेवण बनवणारा नवरा मिळाल्याने ती खूपच लकी आहे अशाही प्रतिक्रिया कमेंट्समध्ये दिल्या आहेत.

डॉ. नेनेंनी यापूर्वी माधुरीबरोबर मिळून मिसळ बनवली होती. त्यानंतर होळीनिमित्त त्यांनी खास पुरणपोळीचा बेत केला होता. आता त्यांनी पावसाळ्यानिमित्त मँगो स्टिकी राइस बनवला आहे. त्यांच्या पाककौशल्याचं कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा : Video : अजय-अतुल, श्रेया घोषलचा लाईव्ह परफॉर्मन्स अन् राधिका मर्चंटची सुंदर रथातून मंडपात ग्रँड एन्ट्री; तर अनंत अंबानी…

हेही वाचा : Shah Rukh Khan and Salman Khan Dance : अनंत अंबानीच्या वरातीत करण-अर्जुनचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

dr nene
डॉ. नेनेंनी बनवला खास पदार्थ

दरम्यान, यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर माधुरी व डॉ. नेनेंची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये दिग्गज मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली. नुकतीच या जोडप्याने एकत्र अंबानींच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती लावून जबरदस्त डान्स केल्याचं पाहायला मिळालं.

Story img Loader