Madhuri Dixit : आपल्या सुंदर हास्याने, सौंदर्याने आणि अभिनयाने लाखो चाहत्यांना भुरळ घालणारी बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून अभिनेत्रीने मनोरंजन विश्वात पदार्पण केलं होतं. माधुरीच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. पण, त्यानंतर आलेल्या ‘तेजाब’मुळे अभिनेत्री रातोरात सुपरस्टार झाली. आज वयाच्या ५७ व्या वर्षी देखील माधुरी तेवढीच फिट आणि सुंदर दिसते. नुकतीच अभिनेत्रीने आपल्या पतीसह बीकेसी NMACC मधल्या आर्ट्स कॅफे लॉन्चला उपस्थिती लावली होती.

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या (NMACC) तिसऱ्या मजल्यावर असलेला NMACC आर्ट्स कॅफे येत्या २९ डिसेंबरपासून सर्वसामान्य लोकांसाठी खुला होणार आहे. या कॅफेच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती. अंबानी कुटुंबीय, अन्यया व तिची आई भावना पांडे, जान्हवी कपूर, शाहरुख खान-गौरी, विद्या बालन, अर्जुन कपूर, करण जोहर, सुहाना खान, शाहिद कपूर व मीरा राजपूत यांसह माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ) व तिचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी देखील या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

हेही वाचा : महिलेच्या मृत्यूनंतरही अल्लू अर्जुन थिएटरमध्ये थांबला, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचा दावा; अभिनेता म्हणाला, “मी इतका…”

माधुरी दीक्षितच्या व्हिडीओने वेधलं लक्ष

मिस्टर अँड मिसेस नेनेंचा या आर्ट्स कॅफे लॉन्च सोहळ्यात डॅशिंग लूक पाहायला मिळाला. माधुरीने Rose गोल्ड रंगाचा ऑफ शोल्डर सुंदर असा वनपीस ड्रेस घातला होता. लांब कानातले आणि पेन्सिल हिल्स घालून अभिनेत्रीने पापाराझींसमोर एन्ट्री घेतली. या जोडप्याने एकमेकांचा हात पकडून एकत्र कॅमेऱ्यासमोर पोज दिल्या. डॉ. नेनेंनी यावेळी ब्लॅक सूट घातला होता.

माधुरी ( Madhuri Dixit ) आणि डॉ. नेनेंनी एकत्र कॅमेऱ्यासमोर पोज दिल्यावर सर्वत्र त्यांचं कौतुक करण्यात आलं. पण, या सगळ्यात एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरली. ती म्हणजे, पोज दिल्यावर डॉ. श्रीराम नेने स्वत: बाजूला झाले आणि रेड कार्पेटवर आपल्या पत्नीला सोलो पोज देण्यासाठी प्रोत्साहन दिलं. माधुरीला पोज देताना ते एका बाजूला उभे होते. त्यांची ही कृती प्रत्येकाला भावली आहे. डॉ. नेनेंचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा : Bigg Boss 18: दिग्विजय सिंह राठीनंतर आणखी दोन सदस्य घराबाहेर; कशिश कपूर ढसाढसा रडत म्हणाली, “इथे प्रत्येकजण साप…”

दरम्यान, माधुरी दीक्षितच्या ( Madhuri Dixit ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘भुल भुलैया’च्या तिसऱ्या भागात झळकली होती. या चित्रपटातल्या तिच्या भूमिकेचं सर्वत्र भरभरून कौतुक करण्यात आलं होतं.

Story img Loader