माधुरी दीक्षित मराठीसह बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये नेहमीच चर्चेत असते. सध्या ती ‘डान्स दिवाने’ कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. बॉलीवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री असूनही माधुरीने आपला मराठमोळा स्वभाव कायम जपला. तिच्या याच गोष्टीचं सर्वत्र कौतुक करण्यात येतं. याशिवाय तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे देखील सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांचे रेसिपी व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होतात. यापूर्वी या दोघांनी मिळून मिसळ बनवली होती. आता होळीनिमित्त डॉ. नेनेंनी खास पुरणपोळीचा बेत केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

होळीच्या सणानिमित्त महाराष्ट्रातील घरोघरी पुरणाची पोळी बनवली जाते. याची खास पाककृती डॉ. श्रीराम नेने यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे. सर्वप्रथम त्यांनी पुरण वाटून घेतलं. पुढे, मऊसूत पुरणपोळी लाटून, ती तव्यावर शेकवून त्यावर तुपाची धार सोडली. त्यांची पाककला पाहून नेटकरी भारावून गेले आहेत.

हेही वाचा : Video : “तिच्यासारखीच सून…”, अंकिता लोखंडेचा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचल्या सासूबाई; सुनेबद्दल काय म्हणाल्या?

“होळी हा महाराष्ट्रातील कौटुंबिक सण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील घरोघरी प्रेमाने बनवली जाणारी सगळ्यांची आवडती पुरणपोळी कशी करतात हे आज तुम्ही माझ्याकडून शिका” असं कॅप्शन डॉ. नेने यांनी या व्हिडीओला दिलं आहे. यामध्ये शेवटी त्यांचे आई-बाबा पुरणपोळीचा आस्वाद घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : १६ व्या वर्षी घर सोडणारी ‘धाकड’ कंगना रणौत बॉलीवूडची ‘क्वीन’ झाली, पण…

डॉ. नेने यांना एवढी वर्षे अमेरिकेत राहून महाराष्ट्रातील हा पारंपरिक पदार्थ बनवता येतोय हे पाहून चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. तसेच माधुरीच्या पतीवर कमेंट्स सेक्शनवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे. “माधुरीने पोरीनं नशीब काढलं नवऱ्याला पुरण पोळी येते न्हवं… लय भारी”, “डॉक्टर साहेब एक नंबर”, “सर तुम्ही पुरणपोळी बनवली खूप छान वाटलं” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर माधुरी व डॉ. नेनेंची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटामध्ये दिग्गज मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळाली.