९० च्या दशकात अधिराज्य गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ओळखलं जातं. ‘तेजाब’, ‘दयावान’, ‘राम-लखन’, ‘खलनायक’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने दर्जेदार भूमिका निभावल्या आहेत. याशिवाय माधुरी तिच्या उत्तम नृत्यासाठी देखील ओळखली जाते. करिअरच्या शिखरावर असताना १९९९ मध्ये अभिनेत्रीने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न झाल्यावर माधुरी काही वर्षे अमेरिकेत स्थायिक झाली होती. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजेच २०११ मध्ये ती संपूर्ण कुटुंबासह भारतात परतली. आज धकधक गर्ल तिचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने माधुरीचे पती डॉ. नेने यांनी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा : Video: ‘बजरंगी भाईजान’च्या मुन्नीने डान्स व्हिडीओमुळे ट्रोल करणाऱ्यांची बोलती केली बंद; हर्षाली मल्होत्रा ‘इतक्या’ टक्क्यांनी दहावी झाली पास

डॉ. नेने पत्नीबद्दल लिहितात, “मनमोहक हास्य, चेहऱ्यावर कायम तेज आणि नृत्याची प्रचंड आवड असणाऱ्या माझ्या आयुष्यातील या महत्त्वाच्या स्त्रीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुझं आमचं सगळ्यांच्या जीवनात असणं हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. खरंच आम्ही सगळे (कुटुंबीय ) तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. #ForeverInLove”

हेही वाचा : “हास्यजत्रेतून मनाविरुद्ध एक्झिट घेतली”, भूषण कडूने सांगितला खडतर प्रसंग; म्हणाला, “गोस्वामी सरांना…”

माधुरीच्या पतीने या पोस्टबरोबर एक सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी दोघांचे रोमँटिक फोटो, माधुरीचे काही जुने फोटो, तिचे मुलांबरोबरचे व सासू-सासऱ्यांबरोबरचे फोटो एकत्र व्हिडीओ स्वरुपात शेअर केले आहेत. डॉ. नेनेंनी या व्हिडीओला ‘आजा नचले’ चित्रपटातील “इश्क़ हुआ ही हुआ” हे गाणं जोडलं आहे. आज वाढदिवसानिमित्त माधुरीवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.

हेही वाचा : बायकोचं निधन, आर्थिक चणचण ते आत्महत्येचा विचार; अखेर भूषण कडू झाला व्यक्त, सांगितला ‘तो’ कठीण काळ

दरम्यान, कॉमेडीयन भारती सिंग, काजोल, मलायका अरोरा, फराह खान, जॅकी श्रॉफ, अर्जुन बिजलानी, सुनील शेट्टी यांनी इन्स्टाग्रावर स्टोरी शेअर करत अभिनेत्रीला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय आज समस्त बॉलीवूडमधून माधुरीवर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव करण्यात आहे. अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या माधुरी ‘डान्स दीवाने’ कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. या शोमध्ये गेल्या आठवड्यात माधुरीच्या वाढदिवसानिमित्त खास सेलिब्रेशन करण्यात आलं.

Story img Loader