इन्स्टाग्राम असो किंवा फेसबुक सगळ्या समाजमाध्यमांवर सध्या एकच गाणं व्हायरल होतंय ते म्हणजेच “प्रेमिका…”. १९९४ मध्ये हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं. प्रभुदेवा आणि दाक्षिणात्य अभिनेत्री नगमा यांच्यावर चित्रित झालेल्या या गाण्याने प्रेक्षकांची चांगलीच प्रसिद्धी मिळवली होती. परंतु, आता पुन्हा एकदा रील्समुळे हे गाणं चर्चेत आलं आहे.

सोशल मीडियावर सध्या प्रभुदेवाच्या या लोकप्रिय गाण्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत कोणालाही या गाण्यावर रील्स बनवण्याचा मोह आवरत नाहीये. अगदी बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितने देखील या गाण्यावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या दिलखेचक अदांनी सर्वांच लक्ष वेधून घेतलं आहे.

Little girl dance
‘आरारारा खतरनाक…’ स्केटिंग शूज घालून चिमुकलीने केला ‘पीलिंग्स’ गाण्यावर हटके डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Lagnanatr Hoyilch Prem
Video: ‘लग्नानंतर होईलच प्रेम’मधील काव्या व जीवाचा ‘लव्हयापा’वर डान्स; चाहते म्हणाले, “लय भारी”
kiliye kiliye new song
‘काय ती स्टाईल….काय तो स्वॅग…सगळंच एकदम भारी!’ चिमुकल्याचा डान्स पाहून नेटकऱ्यांना Jr. NTR आठवला…Viral Video बघाच
Premachi Goshta Fame Apurva Nemlekar dance on Rekha song in ankhon ki masti
Video: “इन आँखों की मस्ती…”, ‘प्रेमाची गोष्ट’मधील सावनीचं रेखा यांच्या गाण्यावर सुंदर नृत्य अन् अदाकारी, पाहा व्हिडीओ
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
ladies group dance on marathi song kakhet kalasa gavala valsa kashala marathi old song video goes viral
“काखेत कळसा गावाला वळसा कशाला?” जुन्या मराठी गाण्यावर महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून म्हणाल “नाद पाहिजे फक्त”
a young girl amazing dance on a stage Her face expression
Video : तरुणीने केला एक नंबर डान्स! चेहऱ्यावरील हावभाव आणि ऊर्जा पाहून नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव

हेही वाचा : Video : पती निक जोनस व लेकीसह अयोध्येला पोहोचली प्रियांका चोप्रा, घेतलं रामलल्लाचं दर्शन, व्हिडीओ व्हायरल

“प्रेमिकाने प्यार से…” या गाण्यावर माधुरीने खास बॉलीवूड स्टाईलने डान्स केला आहे. हिरव्या रंगाच्या भरजरी ड्रेसमध्ये अभिनेत्री फारच सुंदर दिसत आहे. माधुरीच्या या रील्स व्हिडीओचं सध्या सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

हेही वाचा : “मी सतत माझा हार्टरेट…”, अडीच महिन्यांनी पुन्हा त्याच सेटवर परतला श्रेयस तळपदे; अक्षय कुमारसह ‘या’ चित्रपटात झळकणार

नेटकरी या व्हिडीओवर “रिअल ट्रेन्ड विनर”, “आमची आयकॉनिक प्रेमिका”, “माधुरीजी खूप सुंदर”, “लक्षवेधी हावभाव” अशा कमेंट्स करत आहेत. दरम्यान, अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर सध्या माधुरी ‘डान्स दिवाने’ या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका निभावत आहे. याशिवाय जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला नुकतीच तिची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट प्रेक्षकांच्या आला होता.

Story img Loader