Madhuri Dixit Cooking Video : पावसाळा आला की, प्रत्येकाला चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. थंडगार वातावरणात कांदा भजी, वडापाव, पाणीपुरी, मिसळ असे पदार्थ हवेहवेसे वाटतात. परंतु, अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात बहुतांश लोक आरोग्याची काळजी असल्याने अशा तेलकट पदार्थापासून दूर राहतात. या सगळ्यांसाठी खास ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने ऑइल फ्री कांदा भजीची रेसिपी सांगितली आहे. अभिनेत्रीने तिचे पती डॉ. नेने यांच्या युट्यूब चॅनेलवर एकूण कांदा भजीचे पाच प्रकार करून दाखवले आहेत. यामुळे आरोग्य जपणाऱ्या लोकांना निश्चितच फायदा होईल असं डॉ. नेने या व्हिडीओमध्ये सांगत असल्याचं पाहायला मिळत आहे.

९० चं दशक गाजवणारी हरहुन्नरी अभिनेत्री म्हणून माधुरी दीक्षितला ( Madhuri Dixit ) ओळखलं जातं. धकधक गर्लने तिच्या सहज-सुंदर अभिनयाने सर्वांना भुरळ पाडली. आजही तिच्या अभिनयाचे व नृत्याचे लाखो चाहते आहे. करिअरच्या शिखरावर असताना माधुरीने १९९९ मध्ये डॉ. श्रीराम नेनेंशी लग्नगाठ बांधली. यानंतर अभिनेत्री अमेरिकेत संसारात रमली. पुढे काही वर्षांनी भारतात परतल्यावर माधुरी पुन्हा एकदा मनोरंजन विश्वात सक्रिय झाली. नुकतीच माधुरीने खास पावसाळ्यानिमित्त डॉ. नेनेंबरोबर कांदा भजी बनवली आहे. परंतु, अभिनेत्रीने आरोग्याच्या दृष्टीकोनातून या भजीचे एकूण 5 प्रकार चाहत्यांना बनवून दाखवले आहेत.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Budh Shani Kendra Drishti
१२ नोव्हेंबरपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

हेही वाचा : Bigg Boss OTT : अरमान मलिक-कृतिकाच्या ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओवरून वाद, जिओ सिनेमाने स्पष्टीकरण देत दाखल केली तक्रार

माधुरी दीक्षितने बनवली पाच प्रकारची कांदा भजी ( Madhuri Dixit )

माधुरीने डीप फ्राय ( पारंपरिक भारतीय पद्धत ), शॅलो फ्राय, पॅनको, एअर फ्राय आणि बेक्ड अशा पाच प्रकारची कांदा भजी बनवली आहे. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये म्हणते, “तळलेली भजी खाणं हे वेगळ्या प्रकारचं सुख असतं पण, अनेकदा आरोग्याच्या दृष्टीने विचार करून बेक्ड भजी किंवा बेक्ड पकोडे खाणं कधीही उत्तम त्यामुळे मी खास पाच प्रकारच्या भजी बनवल्या आहेत.” पुढे डॉ. नेने सांगतात, “तुम्हाला तेलकट खायचं नसेल, तर अशाप्रकारे भजी तुम्ही बनवू शकता यामुळे आरोग्याला त्रास होणार नाही.”

हेही वाचा : Video : ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम अभिनेत्याने घेतलं नवीन घर! हटके नेमप्लेटने वेधलं लक्ष, व्हिडीओत दाखवली संपूर्ण झलक

madhuri
माधुरी दीक्षित ( Madhuri Dixit ), तिचे पती डॉ. नेने व मुलगा

माधुरीने व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे भजीचं बॅटर तयार करून तुम्ही भजी ओव्हनमध्ये बेक्ड करू शकता, एअर फ्रायरमध्ये तळू शकता, तव्यावर शॅलो फ्राय करून खाऊ शकता किंवा पारंपरिक पद्धतीने तळून या भजीचा आस्वाद घेऊ शकता. ही भजी बनवल्यावर माधुरी, तिचे पती व मुलगा यांनी मिळून गरमागरम मसाला चहा बनवला. या तिघांचं बॉण्डिंग पाहून नेटकऱ्यांनी देखील नेने कुटुंबीयांचं कौतुक केलं आहे.