काही दिवसांपूर्वी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा छोटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा मोठ्या थाटामाटात प्री-वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याची चर्चा देशातच नाही तर जगभरात झाली. अजूनही या सोहळ्यातील फोटो, व्हिडीओ व्हायरल होतं असतात. अशातच मुकेश अंबानींची लेक ईशा अंबानीने नुकतीच होळी पार्टी आयोजित केली होती; ज्याची सध्या चांगली चर्चा रंगली आहे.
ईशा अंबानीच्या होळी पार्टीचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. या पार्टीला बॉलीवूडच्या सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. धकधक गर्ल माधुरी दीक्षित, प्रियांका चोप्रा यांचा या पार्टीतील हटके अंदाज व्हायरल झाला आहे. या पार्टीला माधुरी पती श्रीराम नेनेंसह उपस्थित राहिली होती. यावेळी तिने गुलाबी रंगाचा कोट-पँट घातली होती. तर श्रीराम नेने काळ्या रंगाच्या शिमरी कोट-पँटमध्ये पाहायला मिळाले. तसंच देसी गर्ल प्रियांका फिकट गुलाबी रंगाच्या बॅकलेस व स्लीवलेस मॉर्डन साडीमध्ये दिसली.
हेही वाचा – “खूप मोठा धक्का बसला…”, मिलिंद गवळींनी ओमकार गोवर्धनसाठी लिहिली खास पोस्ट, कौतुक करत म्हणाले…
हेही वाचा – Video: ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणचा संगीत सोहळ्यात ‘चंद्रा’ गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
याशिवाय शिल्पा शेट्टी, अथिया शेट्टी, आयुष्मान खुराना, ईशा गुप्ता अशा अनेक सेलिब्रिटींनी ईशाच्या होळी पार्टीला हजेरी लावली होती. हे सर्व सेलिब्रिटी या पार्टीला ग्लॅमरस लूकमध्ये दिसले.
दरम्यान, अंबानींची होणारी सून राधिका मर्चंट देखील या होळी पार्टीमध्ये पाहायला मिळाली. यावेळी तिने क्रीम कलरचा ऑफशोल्डर इवनिंग गाऊन घातला होता. तिचा लूक इतरांच्या तुलनेत साधा पण एलिगंट होता.