Madhuri Dixit : माधुरी दीक्षित गेल्या काही दिवसांपासून ‘भुल भुलैया ३’ चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगलं यश मिळालं. याशिवाय माधुरी आणि विद्याच्या नृत्याच्या जुगलबंदीचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. पण, सध्या बॉलीवूडची ही धकधक गर्ल एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. ती गोष्ट म्हणजे तिचं मुंबईच्या अंधेरी परिसरातलं ऑफिस. हे ऑफिस अभिनेत्रीने नुकतंच भाड्याने दिलं आहे.
बॉलीवूड सेलिब्रिटी सिनेमांव्यतिरिक्त रिअल इस्टेट मार्केटमधून देखील पैसे कमावताना दिसतात. माधुरीचं ( Madhuri Dixit ) आलिशान ऑफिस मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात आहे. या जागेचं एकूण क्षेत्रफळ १५९४.२४ स्क्वेअर फूट आहे. माधुरीने हे ऑफिस नुकतंच एका खाजगी कंपनीला भाड्याने दिलं आहे. प्रॉपस्टॅकने सादर केलेल्या कागदपत्रांचा हवाला देत हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, माधुरीला या ऑफिसचं भाडं दरमहा तब्बल ३ लाख रुपये मिळणार आहे. यासाठी भाडेकरू कंपनीने ९ लाखांचं डिपॉझिट जमा केलं आहे. पहिल्या वर्षासाठी मासिक ( प्रतिमहिना ) भाडं ३ लाख रुपये, तर दुसऱ्या वर्षी हेच भाडं प्रतिमहिना ३.१५ लाख रुपये असेल. माधुरीप्रमाणे याआधी म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात शाहिद आणि मीरा कपूर यांनीही त्याचं मुंबईतलं ( वरळी परिसर ) घर भाड्याने दिलं होतं.
माधुरी दीक्षितने ( Madhuri Dixit ) काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या लोअर परेल भागात एक आलिशान फ्लॅट देखील खरेदी केला आहे. या घराचं क्षेत्रफळ ५,३८४ चौरस फूट इतकं आहे. याबरोबर सात पार्किंग जागांची सुविधा देखील देण्यात आली आहे. हा भव्य फ्लॅट माधुरीने ४८ कोटींना विकत घेतला होता. तर, नव्या घराचा व्यवहार करताना अभिनेत्रीने २.४ कोटींची स्टॅम्प ड्युटी भरली होती. २८ सप्टेंबर २०२२ मध्ये अभिनेत्रीने या मालमत्तेची नोंदणी केली होती. माधुरीचं हे अपार्टमेंट ५३ व्या मजल्यावर आहे.
हेही वाचा : Best नवरा, बाबा अन्…; रितेश देशमुखच्या वाढदिवशी जिनिलीयाची खास पोस्ट; कमेंट करत म्हणाला, “बायको तुझ्यासाठी…”
दरम्यान, माधुरी दीक्षितच्या ( Madhuri Dixit ) कामाबद्दल सांगायचं झालं, तर नुकतीच ती ‘भुल भुलैया ३’ मध्ये झळकली होती आता येत्या वर्षात कोणत्या भूमिका स्वीकारणार याबद्दल अभिनेत्री सांगते, “मी यावर्षी स्वत:ला आव्हान देणार आहे. मी खूप वेगळं आणि आव्हानात्मक काहीतरी करेन जे मी यापूर्वी केलेलं नाही. या प्रोजेक्टबद्दल लवकरच तुम्हाला माहिती देईन.”
© IE Online Media Services (P) Ltd