Madhuri Dixit And Dr. Shriram Nene : ‘तेजाब’, ‘खलनायक’, ‘दिल तो पागल हैं’, ‘हम आपके है कौन’, ‘राम लखन’, ‘देवदास’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम करून मराठमोळी माधुरी दीक्षित बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ झाली. तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. १० ऑगस्टला अभिनेत्रीच्या चित्रपटसृष्टीतील प्रवासाला एकूण ४० वर्षे पूर्ण होणार आहेत. १० ऑगस्ट १९८४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अबोध’ चित्रपटातून माधुरीने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं.

सिनेविश्वात ४० वर्षे पूर्ण होणार असल्याने अभिनेत्री सध्या USA दौऱ्यावर आहे. माधुरी याठिकाणी तिच्या असंख्य चाहत्यांशी संवाद साधणार आहे. USA दौरा सुरू करण्यापूर्वी न्यू जर्सी येथे अभिनेत्रीने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. यावेळी माधुरीला पत्रकारांनी “तुम्ही डॉ. श्रीराम नेने यांच्याशी संवाद साधताना कधी बॉलीवूड चित्रपटातील गाणी गायली आहेत का किंवा चित्रपटातले संवाद वापरले आहेत का?” असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्रीने दिलखुलासपणे उत्तर दिलं आहे.

Rajesh Khanna, sanjeev kumar
राजेश खन्नांपेक्षा शत्रुघ्न सिन्हा, संजीव कुमार वाईट होते, असं का म्हणाल्या शबाना आझमी?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Asin husband Rahul Sharma
‘या’ बॉलीवूड अभिनेत्यामुळे जमलं ‘गजनी’ फेम असिनचं लग्न; तिचा पती म्हणाला, “ती खूप…”
Sadabhau Khot
“राहुल गांधींचं एकच स्वप्न, मेरी शादी कब होगी?” मारकडवाडीतून सदाभाऊ खोतांचा चिमटा; ‘खळं लुटणारा’ म्हणत पवारांवर टीका
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
suraj chavan meet dcm ajit pawar
“देवमाणूस आहेत दादा…”, अजित पवार उपमुख्यमंत्री होताच सूरज चव्हाण पोहोचला मंत्रालयात! नव्या घराबद्दल म्हणाला…
Amitabh Bachchan angry post
“मूर्ख आणि बिनडोक…”, अमिताभ बच्चन कोणावर भडकले? म्हणाले, “विवेकहीन आणि अर्धवट बुद्धी…”
Amiatbh Bachchan And Rekha
रेखा यांनी सांगितला अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सुहाग’ या चित्रपटात काम करण्याचा अनुभव, म्हणाल्या, “ज्यांच्याबरोबर मी…”

हेही वाचा : Bigg Boss Marathi : “हिल हिल पोरी हिला…”, दादा कोंडकेंच्या गाण्यावर निक्की तांबोळी व अरबाज पटेलचा जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ

माधुरी दीक्षितचा नवऱ्याबद्दल खुलासा ( Madhuri Dixit )

माधुरीला आणखी एका पत्रकाराने ‘साजन’ चित्रपटातील ‘तू शायर है… मैं तेरी शायरी’ हे गाणं तुम्ही नवऱ्यासाठी कधी गायलं आहे का? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेत्री मनापासून हसली अन् म्हणाली, “माझ्या नवऱ्याला हिंदी नीट बोलता येत नाही. तो मराठी बोलू शकतो…पण, हिंदी नाही त्यामुळे मी असं गाणं किंवा संवाद त्याच्यासमोर कधीच बोलली नाहीये.”

माधुरी तिच्या USA दौऱ्याबद्दल सांगताना म्हणाली, “आपल्या चाहत्यांना प्रत्यक्ष भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो. कारण, त्यांच्या पाठिंब्यामुळे आपण एवढे पुढे आलेलो असतो.” यंदा अभिनेत्री न्यूयॉर्क, डॅलस, अटलांटा अशा अनेक ठिकाणांना भेट देणार आहे.

हेही वाचा : ऑनलाइन TRPच्या यादीत मोठा उलटफेर! ‘बिग बॉस मराठी’ने पहिल्याच आठवड्यात मिळवलं ‘हे’ स्थान, टॉप-१० मालिका कोणत्या?

Madhuri Dixit
माधुरी दीक्षित व कुटुंबीय ( Madhuri Dixit )

दरम्यान, माधुरी दीक्षितबद्दल ( Madhuri Dixit ) सांगायचं झालं, ९० च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं. आजवर तिने सलमान, शाहरुख, अनिल कपूर अशा अनेक बड्या सेलिब्रिटींबरोबर काम केलेलं आहे. लग्नानंतर माधुरी सिनेविश्वातून काही काळ दूर होती. परंतु, अमेरिकेहून भारतात परतल्यावर आता पुन्हा एकदा ती मनोरंजनविश्वात सक्रिय झाली आहे. आता अभिनेत्री लवकरच ‘भुल भुलैय्या ३’ चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय लोकप्रिय डान्स शोमध्ये अभिनेत्री लवकरच परीक्षकाची जबाबदारी सांभाळताना दिसणार आहे.

Story img Loader