माधुरी दीक्षित ही बॉलीवूडमधील एक प्रख्यात अभिनेत्री आणि अप्रतिम सौंदर्यवती आहे. आपल्या सौंदर्याने, अभिनय कौशल्याने आणि अदाकारीने ती प्रेक्षकांची मने जिंकत आली आहे. आज ती सिनेसृष्टीतील एक यशस्वी अभिनेत्री असली, तरी तिचा आजवरचा प्रवास सोपा नव्हता. तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात तिला तिच्या शरीरावरून टीका सहन करावी लागली होती, असे तिने स्वतः एका मुलाखतीत सांगितले.

माधुरी दीक्षितला सुरुवातीच्या काळात चित्रपटसृष्टीतील अन्यायकारक सौंदर्य निकषांचा सामना करावा लागला. ‘तेजाब’ चित्रपटाच्या आधी ती बारीक असल्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले होते. ‘बॉलीवूड हंगामा’ला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले होते.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
voter turnout increase
Voter Turnout Increase: ‘शेवटच्या तासात लाखोंच्या संख्येने मतदान…
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
diljit dossanj back a girl who cried in concert
Video : दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये रडल्याने तरुणी झाली ट्रोल, गायक बाजू घेत म्हणाला, “तुम्ही देशाच्या…”
sharad pawar rain speech
Sharad Pawar: “मी बोलायला लागलो की पाऊस येतो आणि निकाल…”, शरद पवारांचं सूचक विधान; पावसातल्या ‘त्या’ सभेची पुन्हा चर्चा!

हेही वाचा…Video : बाबा रणबीर कपूरच्या टीमला चीअर करण्यासाठी राहा आली फुटबॉलच्या मैदानावर, आलिया भट्टसह लेकीचा व्हिडीओ व्हायरल

या मुलाखतीत माधुरी म्हणाली होती, “माझ्या काळात… त्यांना मी खूपच बारीक वाटायचे. ‘ही हिरोईन आहे? हिला जरा जाड करा,’ असं ते म्हणायचे. पण, मला वाटतं आज तसं काही होत नाही.” मात्र, ही टीका तिच्यावर कधीही कोणी समोरून केली नाही, असेही तिने स्पष्ट केले होते. तिने पुढे सांगितले होते की, “कुणीही कधीच माझ्या समोर असं काही बोललं नाही. फारतर ते म्हणायचे, ‘तू खूपच बारीक आहे,’ मग ‘तेजाब’ आला. त्यानंतर मी बारीक आहे की जाड, याचं काहीच महत्त्व राहिलं नाही.”

माधुरी दीक्षित आज इंडस्ट्रीतील सर्वांत यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिला भारतातील चौथ्या क्रमांकाचा नागरी सन्मान, पद्मश्री मिळाला आहे. आजही तिच्या अदाकारीने ती चाहत्यांना मंत्रमुग्ध करते आणि ती अनेकांची क्रश राहिली आहे.

हेही वाचा…कोल्हापूरच्या मराठमोळ्या सरिताच्या प्रेमात पडलेला आर माधवन! सांगितलं २५ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचं गुपित, म्हणाला…

माधुरीने १९८४ ला ‘अबोध’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. तिला खरी ओळख ‘तेजाब’ या सिनेमातून मिळाली. यानंतर ती ‘दिल’, ‘बेटा’, ‘हम आपके हैं कौन’ यांसारख्या अनेक व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपटांमध्ये झळकली. ‘बेटा’ चित्रपटानंतर ती ‘धक धक गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली. या गाण्यातील अनिल कपूरबरोबरच्या तिच्या अप्रतिम अभिनयाने ती घराघरात पोहोचली. आपल्या कारकिर्दीत तिने अनेक पुरस्कार आणि गौरव मिळवले आहेत.

हेही वाचा…“त्या दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं आणि…”, राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला ‘तो’ अनुभव

माधुरी नुकतीच ‘भूल भुलैया ३’ चित्रपटात झळकली. यामध्ये विद्या बालन, कार्तिक आर्यन आणि तृप्ती डिमरीसुद्धा होते. हा चित्रपट ‘सिंघम अगेन’ या मल्टीस्टारर चित्रपटाबरोबर रिलीज झाला होता, तरीही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले आहे.