बॉलीवूडमधील ९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितचं (Madhuri Dixit) नाव आवर्जून घेतलं जातं. अभिनय, सौंदर्य, नृत्य यांमुळे तिनं चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘बेटा’ या चित्रपटातील ‘धक धक’ या गाण्यानं तिनं सर्वांनाच वेड लावलं. त्यानंतर ‘हम आपके है कौन’, ‘दिल तो पागल है’, ‘देवदास’, ‘खलनायक’ या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत तिनं प्रेक्षकांच्या मनांवर अधिराज्य गाजवलं.

माधुरी दीक्षित आईच्या आठवणीत भावुक

आपल्या अभिनय आणि सौंदर्याद्वारे कायमच चर्चेत राहणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करीत असते. तसेच ती तिच्या कामानिमित्तची माहितीदेखील शेअर करीत असते. अशातच माधुरीनं आपल्या आईसाठी एक भावूक पोस्ट शेअर केली आहे. १२ मार्च २०२३ रोजी माधुरीच्या आईचं निधन झालं. त्यामुळे आजच्या दिवशी तिनं आईच्या आठवणींत भावूक होत, पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

माधुरे दीक्षितची भावुक पोस्ट

माधुरीनं (Madhuri Dixit) सोशल मीडियावर आईचे काही जुने फोटो शेअर केले आहेत आणि भावना व्यक्त करीत असं म्हटलं आहे, “गेली दोन वर्षं तुझ्याशिवाय गेली आणि या दोन वर्षांत असा एकही दिवस गेला नाही की, मला तुझी आठवण आली नाही. तुझं प्रेम, तुझं शहाणपण आणि तुझं अस्तित्व मला माझ्या प्रत्येक क्षणाला जाणवतं. आई, तू कायम माझ्या हृदयात आहेस”. माधुरीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सद्वारे तिच्या आईला आदरांजली वाहिली आहे.

१२ मार्च २०२३ रोजी माधुरी दीक्षितच्या आईचे

माधुरी दीक्षितची आई (Madhuri Dixit Mother) स्नेहलता दीक्षित यांचं १२ मार्च २०२३ रोजी मुंबईमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माधुरीनं अनेकदा मुलाखतींमधूनही तिच्या आईविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या आजवरच्या कारकिर्दीत आईचं मोठं योगदान असल्याबद्दल तिनं कायमच स्पष्ट केलं आहे. अशातच आईच्या स्मरणात माधुरी भावूक झाली आहे.

माधुरी दीक्षितची ‘स्टार प्रवाह पुरस्कार’मध्ये हजेरी

दरम्यान, माधुरीनं (Madhuri Dixit) बॉलीवूडचा मोठा पडदा गाजवल्यानंतर ती टीव्हीवरील अनेक रिअॅलिटी शोनधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. अनेक शोचं तिनं परीक्षणदेखील केलं आहे. अशातच माधुरी ‘स्टार प्रवाह पुरस्कार’ सोहळ्यात हजेरी लावणार आहे. ‘धक धक गर्ल’च्या येण्यानं साहजिकच या सोहळ्याची रंगत आणखी वाढणार आहे. येत्या १६ मार्च रोजी हा पुरस्कार सोहळा पाहता येणार आहे.