Madhuri Dixit Vinod Khanna Intimate scene: बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या एकापेक्षा एक चित्रपट आणि भूमिकांसाठी ओळखली जाते. सौंदर्य, अभिनय व नृत्यासाठी अभिनेत्रीचे नाव घेतले जाते. माधुरी दीक्षितला बॉलीवूडची ‘धकधक गर्ल’ म्हणूनदेखील ओळखले जाते.
माधुरी दीक्षितचे ‘हम आपके है कौन’, ‘कोयला’ यांसारखे अनेक चित्रपट प्रचंड गाजले. मात्र, विनोद खन्ना यांच्याबरोबरचा ‘दयावान’ या चित्रपटाची आजही चर्चा होताना दिसते. याचे कारण म्हणजे चित्रपटातील माधुरी दीक्षित आणि विनोद खन्ना यांचा किसिंग सीन. १९९८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील ‘आज फिर तुम पे प्यार आया है’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
माधुरी दीक्षितच्या ओठांतून रक्त येऊ लागले…
‘दयावान’ हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा माधुरी दीक्षित इंडस्ट्रीमध्ये नवीन होती; तर विनोद खन्ना त्यावेळी सुपरस्टार होते. अनेक रिपोर्ट्सनुसार चित्रपटात विनोद खन्ना व माधुरी दीक्षित यांच्या किसिंग सीनच्या शूटदरम्यान अभिनेत्याला स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही विनोद खन्ना माधुरी दीक्षितला पाच मिनिटे किस करीत होते. तसेच ते तिच्या ओठांना चावले होते. परिणामी, माधुरी दीक्षितच्या ओठांतून रक्त येऊ लागले. त्या सीनच्या शूटिंगनंतर अभिनेत्री स्वत:ला रडण्यापासून रोखू शकली नाही. त्यानंतर विनोद खन्ना यांनी माधुरी दीक्षितची माफीही मागितली होती.
जेव्हा ‘दयावान’ चित्रपट प्रदर्शित झाला, त्यावेळी या सीनवरून मोठा वाद निर्माण झाला. चित्रपटाचे दिग्दर्शक फिरोज खान यांना चित्रपटातून हा सीन काढून टाकण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. विशेष बाब म्हणजे माधुरी दीक्षितनेदेखील चित्रपटातून हा सीन काढून टाकावा, अशी विनंती केली होती. मात्र, फिरोज खान यांनी चित्रपटातील हा सीन तसाच राहावा यासाठी एक कोटी रुपये दिले होते.
‘जनसत्ता’नुसार, माधुरी दीक्षितने एका जुन्या मुलाखतीत दयावान या चित्रपटातील या सीनबद्दल वक्तव्य केले होते. अभिनेत्री म्हणालेली की, तिला त्या सीनबद्दल कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. आजही जेव्हा ती हा सीन बघते, तेव्हा तिला धक्का बसल्यासारखे वाटते. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली होती.
दरम्यान, विनोद खन्ना जेव्हा यशाच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांनी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला आणि आध्यात्मिक मार्ग निवडला. त्यांचे २७ एप्रिल २०१७ ला निधन झाले.