बॉलीवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) सातत्याने चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. जगभरात तिचे लाखो-करोडो चाहते आहेत. अभिनेत्री अनेकदा काही रिअॅलिटी शोमध्ये परीक्षकपदीदेखील दिसते. ९० च्या दशकात अभिनेत्री तिच्या अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असे. आजही माधुरी दीक्षित तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. याबरोबरच, ९० च्या दशकात माधुरी दीक्षित व माजी क्रिकेटर अजय जडेजा या जोडीची मोठा चर्चा होत असे.

माधुरी दीक्षितव अजय जडेजा यांचे का झालेले ब्रेकअप?

माधुरी दीक्षित व अजय जडेजा हे त्यांच्या करिअरमध्ये यशाच्या शिखरावर होते. असे म्हटले जाते की माधुरी दीक्षित व अजय जडेजा यांची भेट एका फोटो शूटदरम्यान झाली. त्यावेळी अजय जडेजा हे बॉलीवूडमध्ये काम करण्याची संधी शोधत होते आणि माधुरीने त्यांचे नाव निर्मात्यांना सुचवत अजय जडेजांना मदत केली होती, असे म्हटले जाते. जेव्हा अजय जडेजा यांचे नाव मॅच फिक्सिंग प्रकरणात जोडण्यात आले, तेव्हा त्याचा परिणाम त्यांच्या रिलेशनशिपवरदेखील झाला. त्यानंतर अजय जडेजा यांना त्यांच्या क्रिकेटच्या करिअरमध्ये संघर्ष करावा लागला. त्याचा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरदेखील परिणाम झाला.

अजय जडेजा हे गुजरातमधील जामनगरमधील एका श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती होते. अजय जडेजा यांचे वडील दौलतसिंग जडेजा हे राजकारणात सक्रिय होते. त्यांनी तीन वेळा संसदेत जामनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. अजय जडेजा यांचे नातेवाईकही क्रिकेटशी जोडले गेले आहेत. के. एस. रणजितसिंह यांच्या नावावर भारतातील प्रसिद्ध रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा घेतली जाते. याबरोबरच, के. एस. दुलीपसिंह हे प्रसिद्ध राजघराण्यातील सदस्य होते, त्यांच्या नावावर दुलीप ट्रॉफी आहे. अजय जडेजा यांची क्रिकेटमधील कारकीर्दही प्रभावी होती. त्यांनी १९९५ चा आशिया कप जिंकण्यास भारताला मदत केली. ते जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक होते. अजय यांनी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्वही केले. मात्र, २००० मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे बीसीसीआयने त्यांच्यावर बंदी घातली, ज्यामुळे त्यांची क्रिकेट कारकीर्द संपली. क्रिकेट सोडल्यानंतर अजय यांनी रिअॅलिटी शोमध्ये काम केले, बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केले आणि विविध टीव्ही शोमध्ये क्रिकेट विश्लेषक म्हणून काम केले. याबरोबरच अजय जडेजा यांनी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा मार्गदर्शक म्हणूनदेखील काम केले आहे. २००० साली त्यांनी आदिती जेटली यांच्याबरोबर लग्नगाठ बांधली.

दरम्यान, माधुरी दीक्षितने १९९९ साली श्रीराम नेने यांच्याशी लग्नगाठ बांधली. या जोडीचे अनेकदा कौतुक होताना दिसते. त्यांना दोन मुलेही आहेत. कामाच्या बाबतीत बोलायचे तर अभिनेत्री नुकतीच भुल भूलैय्या ३ मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती. यामध्ये विद्या बालन कार्तिक आर्यन हे कलाकारदेखील प्रमुख भूमिकेत होते. आता अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.