Maha Khumbh Mela 2025 : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे आयोजित करण्यात आलेला महाकुंभ मेळा संपण्यासाठी अवघे काही दिवस बाकी राहिले आहेत. १३ जानेवारीपासून सुरू झालेला महाकुंभ मेळा २६ फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्यामुळे भाविकांसह सेलिब्रिटी महाकुंभ मेळ्याला भेट देताना दिसत आहेत. १४४ वर्षांनी आलेल्या या कुंभ मेळ्यात आतापर्यंत कोट्यवधी भाविकांनी पवित्र स्नान केलं. नुकताच बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजे अक्षय कुमार महाकुंभ मेळ्यात सामिल झाला आणि त्याने पवित्र स्नान केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२५मधील सर्वात मोठा उत्सव महाकुंभ मेळा आहे. १४४ वर्षांनी महाकुंभ मेळा आल्यामुळे देश आणि विदेशातील लोक पवित्र स्नान करण्यासाठी पोहोचले आहेत. अक्षय कुमारदेखील प्रयागराजमध्ये पोहोचला. त्याने त्रिवेणी संगमने पवित्र स्नान केलं. यावेळी अभिनेत्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

अभिनेता अक्षय कुमार २४ फेब्रुवारीला सकाळी महाकुंभ मेळ्यात पोहोचला. यावेळी त्याचा साधा-सरळ अंदाज पाहायला मिळाला. चाहत्यांच्या मोठ्या गर्दीतून अक्षय कसाबसा घाटापर्यंत पोहोचला. त्यानंतर सर्वसामान्यांबरोबर अक्षयने पवित्र स्नान केलं. यावेळी अक्षयबरोबर आयपीएस ऑफिसर विश्वास नांगरे पाटील होते.

‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी संवाद साधताना अक्षय कुमार म्हणाला, “खूप मस्त वाटलं. खूप छान नियोजन केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो. मला अजूनही आठवत २०१९मध्ये कुंभ मेळा झाला होता. तेव्हा लोक खूप सामान वगैरे घेऊन यायचे. आता या महाकुंभ मेळ्यात मोठंमोठी लोक, सेलिब्रिटी येते आहेत. हे पाहूनच कळतं असेल कशा प्रकारे नियोजन केलं आहे. हे खूप चांगलं आहे. जितके पोलीसवाले आहेत, जितके कामगार आहेत; जे सगळ्यांची काळजी घेत आहेत, त्यांचे हात जोडून आभार मानतो.”

दरम्यान, अक्षय कुमार एका वर्षात बरेच चित्रपट करतो. २०२५मध्ये त्याने ‘स्काय फोर्स’ या चित्रपटाने सुरुवात केली आहे. याशिवाय अक्षय लवकरच ‘वेलकम टू द जंगल’, ‘हाउसफुल ५’, ‘भूत बंगला’ आणि ‘हेरा फेरी ३’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.