Maha Khumbh Mela 2025: सध्या सर्वत्र महाकुंभ मेळ्याची चर्चा सुरू आहे. यावर्षी महाकुंभ मेळ्याचं आयोजन उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे करण्यात आलं आहे. १३ जानेवारीपासून महाकुंभ मेळ्याची सुरुवात होणार आहे. अवघे तीन दिवस बाकी असल्यामुळे सध्या प्रयागराजमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. १४ जानेवारीला पहिलं स्नान होणार आहे. नुकतीच सांस्कृतिक मंत्रालयाकडून महाकुंभ मेळ्यात होणाऱ्या परफॉर्मन्सची यादी जाहीर केली. यामध्ये अनेक दिग्गज गायकांसह मराठी कलाकारांची नावं सामील आहेत.

१६ जानेवारीला महाकुंभ मेळ्यात प्रसिद्ध गायक, संगीतकार शंकर महादेवन यांचा परफॉर्मन्स होणार आहे. त्यानंतर १७ जानेवारीला मराठीतील लोकप्रिय गायक महेश काळे यांच्या मंत्रमुग्ध सुरांमध्ये भाविक दंग होणार आहेत. शेवटच्या दिवशी मोहित चौहानच्या भावगीतांसह महाकुंभ मेळ्याचा समारोप असणार आहे.

हेही वाचा – “या फालतू लोकांना…”, पुष्कर जोगने फरहान अख्तरसह शेअर केलेला फोटो पाहून युजरची टीका; अभिनेता म्हणाला, “मी जर XXX असतो ना…”

संपूर्ण महाकुंभ मेळ्यात कैलाश खेर, शान मुखर्जी, हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, कविता सेठ, ऋषभ रिखीराम शर्मा, शोवना नारायण, डॉ. एल सुब्रमण्यम, बिक्रम घोष, मालिनी अवस्थीसह अनेक कलाकार परफॉर्मन्स करणार आहे. यामध्ये ज्येष्ठ गायक पद्मश्री सुरेश वाडकर, राहुल देशपांडे, देवकी पंडीत, सुभद्रा देसाई हे मराठी कलाकार मंडळींचादेखील परफॉर्मन्स होणार आहे. याचे सांस्कृतिक मंत्रालयाने एक प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, या कार्यक्रमांचे उद्दिष्ट भाविकांसाठी एक मंत्रमुग्ध करणारे आध्यात्मिक वातावरण निर्माण करणं आहे.

हेही वाचा – Bigg Boss 18: चाहत पांडेने स्वतः बॉयफ्रेंड असल्याचा केलेला खुलासा, कशिश कपूरला दाखवलेली साखरपुड्याची अंगठी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल

न
कार्यक्रमांची यादी

हेही वाचा – Bigg Boss 18: विवियन डिसेना, चुम दरांगच्या ‘या’ निर्णयामुळे भडकले ‘बिग बॉस’; सर्व सदस्यांना दिल्या दोन शिक्षा

दरम्यान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाकुंभाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रयागराजला भेट दिली. त्यांनी विविध आखाड्यांना भेट दिली आणि साधूंना भेटले. त्यांच्या भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी संगम घाट परिसरात ‘निषादराज’ क्रूझवर प्रवास केला आणि तयारीची पाहणी केली. या दौऱ्यात अधिकारीही त्यांच्याबरोबर होते. याशिवाय उत्तर प्रदेशच्या प्रशासनाने १२५ रुग्णवाहिका तैनात केल्या आहेत. अशाप्रकारे उत्तर प्रदेश सरकारने बरीच व्यवस्था केली. या महाकुंभ मेळ्यात १० कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 

Story img Loader