९० च्या दशकातील लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या खूप चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे तिने आता प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यादरम्यान संन्यास घेतला. ती किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे. संन्यासानंतर ममताचे नाव बदलण्यात आले. यापुढे ती श्री यमाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाईल.

५२ वर्षीय ममता कुलकर्णीचं जन्म नाव पद्मावती कुलकर्णी आहे. तिने सिनेसृष्टीत येण्यासाठी नाव बदललं होतं. ममताचा जन्म २० एप्रिल १९७२ रोजी मुंबईत एका मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला. तिचे कुटुंब वर्सोवा भागात वास्तव्यास होते. मुंबईतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण करणाऱ्या ममताला अभिनयात फार रस नव्हता. मात्र तिने या क्षेत्रात यावं अशी तिच्या आईची इच्छा होती. ममता व तिची बहीण मुलिना कुलकर्णी दोघीही अभिनयक्षेत्रात आल्या.

Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
Mahakumbh 2025 Mamta Kulkarni Kinnar Akhada
Mahakumbh 2025: इंजिनीअर्स, डॉक्टर्स व तरुणांना किन्नर आखाड्याचे आकर्षण का?
Funny video of young man clearing traffic to catch bus viral video on social media
पठ्ठ्यानं २ मिनिटांत ट्रॅफिक केलं क्लिअर, भररस्त्यात ‘असं’ काही केलं की सगळे बघतच राहिले, VIDEO पाहून पोट धरून हसाल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
madhuri dixit mumbai home inside photos
माधुरी दीक्षितचं मुंबईतील घर आतून कसं दिसतं? पाहा ५३ व्या मजल्यावरील अपार्टमेंटचा Inside Video
chhaava director laxman utekar big decision to delete controversial scene and pre release show
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी इतिहासातील जाणकारांना दाखवणार का? वादानंतर ‘छावा’चे मराठमोळे दिग्दर्शक म्हणाले…
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल

ममता कुलकर्णीचे चित्रपट

ममताने १९९१ मध्ये ‘नानबर्गल’ या तमिळ चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. त्याच वर्षी तिचा पहिला हिंदी चित्रपट ‘मेरा दिल तेरे लिए’ प्रदर्शित झाला होता. ममताने तिच्या करिअरमध्ये एकूण ३४ चित्रपट केले. ‘आशिक आवारा’, ‘करण अर्जुन’, ‘नसीब’, ‘सबसे बडा खिलाडी’, ‘क्रांतीवीर’, ‘आंदोलन’, ‘छुपा रुस्तम’, ‘घातक’, ‘वक्त हमारा है’, ‘बाजी’ हे तिचे गाजलेले चित्रपट आहेत. तिने हिंदीबरोबरच मराठी, तमिळ, बंगाली चित्रपटही केले. तिचा शेवटचा चित्रपट ‘कभी तुम कभी हम’ २३ वर्षांपूर्वी २००२ मध्ये प्रदर्शित झाला होता.

mamta kulkarni
ममता कुलकर्णी (फोटो – इन्स्टाग्राम)

ममता कुलकर्णीची संपत्ती किती?

डीएनएने मीडिया रिपोर्ट्सनुसार दिलेल्या माहितीनुसार, ममता कुलकर्णीची एकूण संपत्ती अंदाजे ८५ कोटी रुपये आहे. बॉलीवूडपासून दूर गेल्यानंतरही ती आर्थिकदृष्ट्या सक्षम होती. २००० मध्ये तिने इंडस्ट्री सोडली, त्यानंतर ती दुबईला निघून गेली. महिनाभरापूर्वी भारतात येण्याआधी ती दुबईत राहत होती. ती २५ वर्षांनी २०२४ मध्ये मुंबईत आली, तर मागील कुंभमेळ्यानंतर दुसऱ्यांदा भारतात आली.

ममता कुलकर्णी तिच्या चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिली. तिचे नाव ड्रग्ज प्रकरणात आले होते. तसेच ड्रग्ज प्रकरणात आरोप झालेल्या विकी गोस्वामीबरोबर ती रिलेशनशिपमध्ये होती. त्यांनी लग्न केल्याच्या चर्चा होत्या, मात्र ममताने त्या फेटाळल्या. विकीच्या प्रेमात होते, पण लग्न केलं नाही, असं तिने सांगितलं.

Story img Loader