अभिनेता, विकी कौशलचा भाऊ व कतरिना कैफचा दीर सनी कौशलचा आज ३४ वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अशातच त्याला त्याची कथित गर्लफ्रेंड शर्वरी वाघने एक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. शर्वरी व सनी एकमेकांना डेट करत असल्याची चर्चा आहे.

नाना पाटेकरांचं खरं नाव माहितीये का? रायगडमध्ये जन्मलेल्या नानांची कौटुंबीक व शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून थक्क व्हाल

siddharth shukla shehnaz gill
शहनाज गिलने दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्लासाठी शेअर केली पोस्ट, ते दोन आकडे अन् चाहते म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Raj Kapoor
ऋषी कपूर यांनी लेकीच्या सासऱ्यांना दिलेली ‘ही’ खास भेट; रिद्धिमा कपूर आठवण सांगत म्हणाली, “राज कपूर यांच्या…”
rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Shalva Kinjawadekar and Shreya Daflapurkar Pre Wedding Rituals
आली लग्नघटिका समीप! पार पडला ग्रहमख सोहळा, ‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या होणार्‍या पत्नीने शेअर केले खास फोटो
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
Maharashtrachi hasyajatra fame Namrata Sambherao praises to mother in law
“माझी सासू माझा एक पाय…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावने सासूबाईचं केलं कौतुक; म्हणाली, “माझ्या रुद्राजची ती यशोदा…”

शर्वरीने सनीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा सनी’, असं म्हणत तिने सूर्य, चश्मा आणि रेड हार्ट असे तीन इमोजी शेअर केले आहेत. फोटोमध्ये सनी व शर्वरी खूप सुंदर दिसत आहेत. सनीच्या वाढदिवसानिमित्त त्याचं रॅप साँग आलं आहे. ‘झंडे’ असं त्या गाण्याचं नाव आहे. शर्वरीने गाण्याची लिंकही तिच्या स्टोरीला शेअर केली आहे.

Sharvari Wagh birthday wishes to Sunny Kaushal
शर्वरी वाघची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो – स्क्रीनशॉट)

दरम्यान, ‘बंटी बबली २’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी शर्वरी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची नात आहे. तिचे वडील शैलेश वाघ हे मुंबईतील प्रसिद्ध बिल्डर आहेत. तर, तिची बहीण कस्तुरी आणि आई नम्रता वाघ या दोघी आर्किटेक्ट आहेत. सनी कौशल आणि शर्वरी वाघ यांनी कबीर खानच्या ‘द फॉरगॉटन आर्मी: आझादी’ या वेब सीरिजमध्ये एकत्र काम केले होते.

अभिनेत्रीने मुलाखतीदरम्यान एकाला मारलं, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर म्हणाली, “मी जे केलं ते…”

शर्वरी वाघने बॉलिवूडमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. २०१५ मध्ये तिने पहिल्यांदा ‘प्यार का पंचनामा २’ साठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिलं. यानंतर तिने ‘बाजीराव मस्तानी’मध्ये व ‘सोनू के टीटू की स्विटी’मध्येही सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.

Story img Loader