बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित ‘जवान’ चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटामध्ये नयनतारा, विजय सेतुपति, प्रियामणि, सान्या मल्होत्रा, रिद्धि डोगरा, लहर खान, गिरीजा ओक, संजीता भट्टाचार्य, सुनील ग्रोवर, संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या कॅमिओ भूमिकेत पाहायला मिळत आहे. आता या चित्रपटाची प्रसिद्ध मराठी अभिनेत्यालाही भूरळ पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय शोमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून पृथ्वीक प्रतापला ओळखले जाते. अभिनय आणि विनोदाची उत्तम सांगड घालत पृथ्वीक प्रेक्षकांना खळखळवून हसवतो. पृथ्वीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.
आणखी वाचा : शाहरुख खानचा ‘जवान’ चित्रपट पाहिल्यानंतर प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याची प्रतिक्रिया, म्हणाला “हा चित्रपट भ्रष्टाचारावर…”

या व्हिडीओत पृथ्वीक प्रताप हा हुबेहुब शाहरुख खानप्रमाणे नाचताना दिसत आहे. तसेच त्याने शाहरुखप्रमाणेही टक्कल केलेला लूकही केल्याचे पाहायला मिळत आहे. याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.

“जवानच्या पार्श्वभूमीवर हे रील आणि दहिहंडीच्या पार्श्वभूमीवर माझी हंडी म्हणजे माझं टक्कल सादर करतोय”, असे कॅप्शन पृथ्वीक प्रतापने या व्हिडीओला दिले आहे.

आणखी वाचा : इंडिया आणि भारत वादादरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय, आगामी चित्रपटाच्या नावात केला बदल

दरम्यान पृथ्वीक प्रतापच्या या व्हिडीओवर अभिनेत्री रसिका वेंर्गुलेकरने कमेंट केली आहे. आमच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा शाहरुख खान, अशी कमेंट रसिकाने केली आहे. तर प्रियदर्शनी इंदलकरने हसण्याचा इमोजीही शेअर केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame actor prithvik pratap share reel video with shah rukh khan jawan movie look nrp
Show comments