लोकप्रिय अभिनेत्री वनिता खरात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून घराघरात पोहोचली. अभिनयाच्या जोरावर मनोरंजनविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या वनिताने बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरबरोबरही स्क्रीन शेअर केली होती. ‘कबीर सिंग’ चित्रपटात वनिता झळकली होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत वनिताने बॉलिवूड इंडस्ट्री व शाहीद कपूरबद्दल भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वनिता खरातने नुकतीच ‘संपूर्ण स्वराज; या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने वैयक्तिक व मनोरंजनविश्वातील अनेक गोष्टींवर भाष्य केलं. कबीर सिंग चित्रपटातील वनिताने साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही झालं होतं. वनिताने या मुलाखतीत बॉलिवूडमध्ये काम करण्याचा अनुभव शेअर केला.

हेही वाचा>> “माझं न्यूड फोटोशूट पाहून मित्राने फोन केला अन्…”, वनिता खरातने सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाली, “तो फोटो फ्रेम करून…”

वनिता म्हणाली, “सुरुवातीला मला खूप भीती वाटायची. पण, आपलं काम चांगलं असलं की सगळ्या गोष्टी सोप्या होऊन जातात. बॉलिवूडमधील लोक कलाकारांचा आदर करतात. त्यांनी कधी आपल्याला बघितलेलंच नसतं. त्यामुळे ते एकदम नॉर्मल वागतात. पण काम बघितल्यावर ते खूप कौतुक करतात. हे मला ‘कबीर सिंग’च्या बाबतीत जाणवलं.”

हेही वाचा>> Video : “गुदमरून मारण्यासाठी…”, हवेतील धुराचे लोट पाहून प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची संतप्त पोस्ट

शाहीदबरोबर काम केल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय होती, याबाबतही वनिताने भाष्य केलं. “मी शाहीदबरोबर पहिला सीन केल्यानंतर माझ्याबद्दलची त्याची प्रतिक्रिया खूपच वेगळी होती. सुरुवातीला तो येऊन भेटला, बोलला. पण सीन शूट झाल्यानंतर तो एकदमच भारावून गेला होता. तू खूप चांगलं काम करते. तुझ्याबरोबर काम करताना मला मज्जा आली. चित्रपटानंतर मी शाहीद कपूरबरोबर एका अवॉर्ड शोमध्येही काम केलं. त्यावेळीही तो तेवढ्याच आपुलकीने येऊन मला भेटला. बॉलिवूडमध्ये मला खूप चांगली वागणूक मिळाली,” असंही वनिताने सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vanita kharat talk about bollywood said shahid kapoor impressed by her performance kabir singh kak