बॉलीवूड अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूर ‘फॅब्यूलस लाइव्ह्ज व्हर्सेज बॉलीवूड वाईव्ह्ज’ या शोसाठी ओळखली जाते. ती अभिनेता अर्जुन कपूर, सोनम कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांची काकू आहे. लोकांना महीप व संजय यांच्या लव्ह स्टोरीबद्दल फार माहिती नाही. आता महीपनेच एका मुलाखतीत सांगितलं की ती मद्यधुंद अवस्थेत संजय व त्याच्या कुटुंबाला भेटली होती. ती संजयला वन-नाइट स्टँडसाठी भेटली आणि नंतर त्यांनी लग्न केलं, असं ती म्हणाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महीप कपूरने नुकतीच रौनक राजानीच्या चॅनलला मुलाखत दिली. तिला तिच्या व संजय कपूरच्या लव्ह स्टोरीबद्दल विचारण्यात आलं. “आमची लव्ह स्टोरी खूप साधी होती. मी त्याच्यासोबत वन-नाईट स्टँडसाठी गेले होते आणि मला कधीच वाटलं नव्हतं की मी त्याच्याशी लग्न करेन. बोलावलं नसतानाही मी मद्यधुंद अवस्थेत त्याच्या पार्टीत गेले होते आणि तिथेच त्याला भेटले,” असं महीप म्हणाली.

हेही वाचा – ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्याची लगीनघाई! होणाऱ्या पत्नीसह केलं प्री-वेडिंग शूट, हळदीला सुरुवात; फोटो आले समोर

मद्यधुंद अवस्थेत संजयच्या कुटुंबाला भेटली

महीप पुढे म्हणाली, “मी त्याच्या संपूर्ण कुटुंबाला भेटले. सासू, सासरे… तुम्ही माझ्या कुटुंबाला ओळखता ना? अनिल (कपूर), सुनीता, श्री (श्रीदेवी) सर्वांना भेटले. मी मद्यधुंद अवस्थेत होते पण तरीही त्यांनी मला स्वीकारलं आणि मोठ्या मनाने माझं स्वागत केलं.”

वन नाईट स्टँड ते संजय कपूरबरोबरचा लग्नापर्यंतचा प्रवास तिने सांगितला. तसेच तिने व संजयने एकमेकांना कधीच प्रपोज केलं नव्हतं. “आम्ही एकमेकांना प्रपोज केलं नव्हतं, त्याने मला फक्त इतकंच म्हटलं की बघ आपण लग्न करतोय,” असं महीप म्हणाली.

हेही वाचा – “मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”

महीप व संजय यांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केलं होतं, त्यानंतर ते लग्नबंधनात अडकले होते. संजयबरोबर आता ३० वर्षे झाली आहेत, असं महीपने सांगितलं. एका नाइट क्लबमध्ये संजयने महीपला लग्न करायचंय असं सांगितलं होतं. तो दिवस आठवून महीप म्हणाली, “आम्ही कुलाबा ताजमध्ये नाईट क्लबमध्ये होतो. आम्ही नशेत होतो. आम्ही पार्टी करत होतो. तो म्हणाला, ‘आपण लग्न करतोय’. मी दारू पितानाच म्हटले ‘ठीक आहे.’ एवढंच. आम्ही इन्स्टाग्रामवर फोटो टाकण्यासाठी गुडघ्यावर बसून प्रपोज वगैरे केलं नव्हतं.”

महीप व संजय यांनी १९९७ मध्ये लग्न केलं. त्यांना शनाया कपूर व जहान कपूर ही दोन अपत्ये आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maheep kapoor met sanjay kapoor for one night stand gatecrashed his party dead drunk hrc