बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिने नुकतंच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई-बाबा झाले आहेत. गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात तिची प्रसूती करण्यात आली. बाळाच्या येण्याने कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. आलियाच्या बाळाच्या जन्माच्या काही तासांपूर्वी तिचे वडील महेश भट्ट यांनी एक प्रतिक्रिया दिली होती. सध्या त्यांची ही प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आज सकाळी ७.३० वाजता गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात पोहोचले होते. ते पहिल्या बाळाच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहितीही समोर येत होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच तिला प्रसूती कळा सुरु झाल्या. यानंतर दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर हिने या बातमीवर शिक्कामोर्तब केले होते.
आणखी वाचा : Alia-Ranbir Blessed with Baby Girl : आलिया-रणबीर झाले आई-बाबा, कपूर कुटुंबात छोट्या परीचं आगमन

आलियाचे वडील महेश भट्ट यांना काही तासांपूर्वी तिच्या बाळाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी फारच हटके शब्दात प्रतिक्रिया दिली होती. तसेच ते त्यांच्या नातावसाठी फार उत्सुक असल्याचे दिसत होते. महेश भट्ट यांना त्यांच्या नातवाबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘मी सध्या नवा सूर्य उगवण्याची वाट पाहत आहे. लवकर एक दवाचा नवा थेंब माझ्या आयुष्याच्या गवतावर पडणार आहे, असे त्यांनी म्हटले होते.

आलियाच्या गरोदरपणाची बातमी समजल्यानंतर महेश भट्ट यांनी एका मुलाखतीत आपला आनंद व्यक्त केला होता. “माझ्या बाळाला बाळ होणार आहे. मी रणबीर आणि आलियासाठी खूप आनंदी आहे. आमची पिढी अशीच वाढत राहायला हवी. आता मला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या भूमिकेसाठी तयारी करायची आहे. लवकरच मी आजोबांच्या भूमिकेत डेब्यू होणार आहे”, असे त्यांनी म्हटले होते.

आणखी वाचा : आई झाल्यानंतर आलिया भट्टची पहिली पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली…

आलियाची गुडन्यूज

बाळाला जन्म दिल्यानंतर आलियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने बाळाच्या जन्माची गुडन्यूज दिली आहे. आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती आमचं प्रेम आहे. आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही पालक झालो आहोत. खूप खूप प्रेम -आलिया-रणबीर, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. त्याबरोबर तिने सिंहाच्या कळपाचा फोटोही शेअर केला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh bhatt comment and speaks about alia bhatt ranbir kapoor baby nrp