बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर नुकतेच आई-बाबा झाले आहेत. आलियाने ६ नोव्हेंबर (रविवारी) एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया-रणबीरला कन्यारत्नाची प्राप्ती झाल्याने कपूर कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसुतीनंतर आलिया आणि तिच्या बाळाबाबतच्या तब्येतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. नीतू कपूर यांनी सून आणि नातीची तब्येत कशी आहे, याचा खुलासा केला आहे. आलियाने मुलीला जन्म दिल्यानंतर कपूर कुटुंबियांसह नीतू कपूर यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. प्रसुतीनंतर त्यांनी पापराझींशी साधलेल्या संवादात आलिया आणि नातीच्या प्रकृतीबद्दलही माहिती दिली. इतकंच नव्हे तर कपूर कुटुंबातील प्रत्येकजण आता रणबीर आणि आलियाच्या कन्यारत्नाचं स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत.

आणखी वाचा : तब्बू, अर्जुन कपूर, नसीरुद्दीन शाह अभिनीत ‘कुत्ते’ या दिवशी झळकणार चित्रपटगृहात; हटके पोस्टरची सर्वत्र चर्चा

अशात आलियाच्या माहेरची मंडळी कशी मागे राहतील. भट्ट कुटुंबातील सदस्यांनी त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. आलियाचा भाऊ राहुल भट्ट यानेसुद्धा मामा झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. ‘बॉम्बे टाइम्स’शी संवाद साधताना राहूलने त्याचा आनंद व्यक्त केला तसेच नव्या पाहुणीला भेटण्यासाठी महेश भट्ट प्रचंड उत्सुक आहेत असंही त्याने स्पष्ट केलं.

राहुल म्हणाला, “आज त्यांना खूप आनंद झाला आहे. लहान बाळाला भेटण्यासाठी ते प्रचंड उत्सुक आहेत. त्यांनाही ३ मुली आहेत आणि आलियालाही मुलगी झाल्याने त्यांना त्यांचे जुने दिवस आठवत आहेत. पूजाचा जेव्हा जन्म झाला तेव्हा ते जेवढे खुश होते तितकेच ते आजही खुश आहेत. आलिया आणि रणबीर दोघेही जबाबदार आहेत आणि पालक म्हणून ते त्यांचं कर्तव्य उत्तमरित्या पार पाडतील.” सध्या रणबीर आणि आलिया आता दोघेही काही काळ चित्रपटांपासून ब्रेक घेणार आहेत.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh bhatt is very much excited to see granddaughter its like dejavu for him says rahul bhatt avn