दिग्दर्शक महेश भट्ट त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत इंडस्ट्रीला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. तसेच अनेक कलाकारांनाही त्यांनी बॉलिवूडमध्ये लाँच केलं. पण सुरुवातीच्या काळात महेश भट्ट यांना आई-वडिलांच्या आंतरधर्मीय लग्नामुळे खूप त्रास सहन करावा लागला होता. आता एका मुलाखतीत त्यांनी याबद्दल खुलासा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुस्लीम आई, दोन लग्न, परवीन बाबीशी अफेअर अन् स्वतःच्याच मुलीबरोबर…; महेश भट्ट यांच्या आयुष्यातील वादग्रस्त किस्से

महेश भट्ट यांनी अरबाज खानचा शो ‘द इन्विनसिबल्स’च्या ताज्या भागात हजेरी लावली. यावेळी त्यांनी त्यांच्या बालपणाबद्दल सांगितलं. महेश यांची आई मुस्लीम तर वडील हिंदू होते. त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या पालकांचं लग्न झालं नव्हतं. त्यामुळे त्यांना अनौरस अपत्य म्हणून हिणवलं जायचं. “माझा जन्म १९४८ मध्ये झाला होता. तो स्वातंत्र्योत्तर भारत होता आणि माझी आई शिया मुस्लीम होती. आम्ही शिवाजी पार्कमध्ये राहत होतो, तिथे बहुतेक लोक हिंदू होते. त्यामुळे तिला आपली ओळख लपवावी लागायची. ती साडी नेसायची आणि टिकली लावायची,” असं महेश भट्ट म्हणाले.

सतीश कौशिक यांच्या मृत्यूप्रकरणाला वेगळं वळण? ‘त्या’ फार्महाऊसमधून पोलिसांनी जप्त केली संशयास्पद औषधं

महेश यांचे वडील नानाभाई भट्ट हे त्यांच्या दुसऱ्या कुटुंबाबरोबर अंधेरीमध्ये राहत होते. ते चित्रपट निर्माते होते. वडिलांबद्दल बोलताना महेश म्हणाले, “जेव्हा ते आमच्या घरी यायचे, तेव्हा मला बाहेरचा माणूस आल्यासारखे वाटायचे. अनेक वाईट लोक मला माझे वडील कोण आहेत असं विचारायचे.” वडील सोबत राहत नव्हते, त्यामुळे लोकांकडून खूप मानसिक छळ केला जायचा. पण एकेदिवशी आपले वडील आपल्याबरोबर राहत नसल्याचं मान्य केल्यानंतर लोकांनी त्रास देणं बंद केलं होतं, असं महेश भट्ट यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh bhatt says he was stigmatized as illegitimate child because his parents were not married hrc