महेश भट्ट दिग्दर्शित ‘सारांश’ हा चित्रपट १९८४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनुपम खेर, रोहिनी हट्टंगडी, मदन जैन, निळू फुले, सुहास भालेकर आणि सोनी राझदान यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. आपल्या एकुलत्या एक तरुण मुलाचा मृत्यू झालेल्या वृद्ध दाम्पत्यावर या चित्रपटाची कथा आधारित आहे. त्यावेळी हा चित्रपट चांगलाच गाजला होता.

चित्रपटातील अनुपम खेर यांच्या कामाची खूपच प्रशंसा झाली. कमी वय असूनसुद्धा इतक्या वृद्ध व्यक्तीची अनुपम यांनी लीलया पार पाडली. नुकतंच या चित्रपटाला ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एका कार्यक्रमात याचे दिग्दर्शक महेश भट्ट यांनी याबद्दल भाष्य केलं आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना महेश भट्ट यांनी जगजित सिंग यांच्याबाबतीतला एक किस्सा शेअर केला आहे.

आणखी वाचा : ‘दबंग ४’च्या माध्यमातून सलमान करणार एक वेगळा प्रयोग; साऊथचा ‘हा’ मोठा दिग्दर्शक लिहिणार कथानक

त्याविषयी बोलताना महेश भट्ट म्हणाले, “जेव्हा जगजित सिंग यांच्या मुलाचा अपघातात अकाली मृत्यू झाला तेव्हा त्यांनी मला सांगितलं की जगजित सिंग यांना त्यांच्या मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी एका सरकारी अधिकाऱ्याला लाच द्यावी लागली होती. अन् त्यावेळी मला ‘सारांश’चं महत्त्व पटलं. एका सामान्य माणसाला आपल्या मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो याची जाणीव झाली. ‘सारांश’मधले बरेच संदर्भ मला या घटनेतून मिळाले.”

जगजित सिंग व चित्रा सिंग यांच्या एकुलत्या एक मुलगा विवेकचे १९९० साली एका अपघातात वयाच्या २० व्या वर्षी निधन झाले. याचा जगजित सिंग व त्यांची पत्नी चित्रा यांच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम झाला. चित्रा यांनी या घटनेनंतर संगीतक्षेत्राला कायमचा रामराम केला. ‘सारांश’मधील अनुपम खेर यांचं काम लोकांना प्रचंड आवडलं. यानंतर अनुपम यांनी पुढे महेश भट्ट यांच्याबरोबर ‘डॅडी’ व ‘दील है की मानता नहीं’ या चित्रपटातही काम केलं.

Story img Loader