Mahesh Bhatt : हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शक व निर्माते म्हणून महेश भट्ट यांना ओळखलं जातं. १९७४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मंजिले और भी है’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यांचे अनेक चित्रपट वादग्रस्त ठरले परंतु, महेश भट्ट यांच्या प्रत्येक सिनेमात काहीतरी वेगळंपण नेहमीच असायचं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी त्यांचा एक चित्रपट नात राहाला दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता राहाच्या आजोबांना तिला नेमका कोणता चित्रपट दाखवायचाय जाणून घेऊयात…

महेश भट्ट यांनी नुकताच ‘इंडिया टुडे’शी संवाद साधला. यावेळी ते आलिया अन् राहाबद्दल भरभरून बोलले. नातीच्या जन्मानंतर स्वत:मध्ये अनेक बदल झाल्याचं देखील महेश भट्ट यांनी मान्य केलं. ते म्हणाले, “राहा जेव्हा मोठी होईल…म्हणजेच ती १६ वर्षांची होईल, तेव्हा तिने माझा ‘दिल है की मानता नहीं’ हा चित्रपट जरूर पाहावा.”

Reshma Shinde
‘रंग माझा वेगळा’मध्ये सावळ्या मुलीला का घेतलं नाही? ‘अशी’ झालेली रेश्मा शिंदेची निवड; मालिकेच्या लेखकानं सांगितलं कारण
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
vidya balan bhool bhulaiyaa 3
‘भूल भुलैया -३’मधली माधुरी आणि माझी जुगलबंदी अविस्मरणीय…- विद्या बालन
savita malpekar bald look in kaksparsh praises Mahesh Manjrekar
“महेशने विचारलं टक्कल करशील का? मी लगेच…”, सविता मालपेकरांनी सांगितला ‘काकस्पर्श’चा किस्सा, म्हणाल्या…
vidya balan on sridevi
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं कौतुक करत विद्या बालनने व्यक्त केली इच्छा; म्हणाली, “मला त्यांना…”
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tharala Tar Mag New Promo
ठरलं तर मग : बाप-लेकीची भेट! अर्जुनने निभावलं जावयाचं कर्तव्य, मधुभाऊंना पाहताच सायलीला अश्रू अनावर, पाहा प्रोमो

हेही वाचा : “जान्हवी तुला लाज वाटत नाही का?”, वर्षा उसगांवकरांना ‘ती’ वागणूक दिल्यामुळे प्रेक्षक संतापले! म्हणाले, “साइड रोल करणारी…”

राहाबद्दल काय म्हणाले महेश भट्ट?

महेश भट्ट ( Mahesh Bhatt ) सांगतात, “दिल है की मानता नहीं’ हा चित्रपट थेट तुमच्या मनाला भिडतो. त्यामुळे राहा मोठी झाल्यावर तिने तो चित्रपट पाहावा असं मला खूप मनापासून वाटतं. आधी मी माझ्या मुलींचा बाबा होतो पण, आता मी आजोबा झाल्यावर प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोन बदलला आहे.”

‘दिल है की मानता नहीं’ हा चित्रपट १९९१ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यामध्ये महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजा भट्ट आणि आमिर खान यांच्या मुख्य भूमिका होत्या.

हेही वाचा : Bigg Boss Marathi : ‘भाऊचा धक्का’ गाण्याचा गायक, गीतकार अन् संगीतकार आहे ‘बिग बॉस’मध्ये झळकलेला ‘हा’ स्पर्धक, पोस्ट करत म्हणाला…

आपली लेक आलियाबद्दल सांगताना महेश भट्ट ( Mahesh Bhatt ) म्हणाले, “आलिया आजच्या घडीला एक उत्तम अभिनेत्री आहेच पण, त्यापेक्षा ती एक उत्तम आई आहे. राहा आमच्या सर्वांसाठीच एक सुंदर असं गिफ्ट आहे, तिच्या येण्याने अनेक गोष्ट बदलल्या. लहान मुलांमध्ये ती एक शक्ती असते ज्यामुळे ते सहज कोणालाही आकर्षित करू शकतात. आम्ही सगळेच तिचे प्रचंड लाड करतो.”

Mahesh Bhatt
आलिया भट्ट व राहा कपूर ( Mahesh Bhatt )

दरम्यान, आलिया भट्टच्या लाडक्या लेकीचा जन्म नोव्हेंबर २०२२ मध्ये झाला. यानंतर राहा एक वर्षांची झाल्यावर २०२३ मध्ये ख्रिसमसच्या दिवशी रणबीर-आलियाने तिचा चेहरा माध्यमांना दाखवला. कपूर कुटुंबीयांनी पापराझींसमोर एकत्र पोज दिल्या होत्या. आता राहा फक्त कुटुंबीयांमध्येच नव्हे तर संपूर्ण सोशल मीडियावर लोकप्रिय आहे.