महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांनी दिग्दर्शित केलेल्या अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मराठीसह त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनयही केला आहे. महेश मांजरेकर यांनी संजय दत्तची प्रमुख भूमिका असलेल्या वास्तव या चित्रपटातून पदार्पण केले होते. वास्तव हा सिनेमा सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. आता महेश मांजरेकर यांनी जेव्हा संजय दत्तला ते ‘वास्तव’ चित्रपटाची स्क्रिप्ट सांगण्यासाठी गेले होते, तेव्हा काय घडलं होतं, याची आठवण सांगितली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महेश मांजरेकर यांनी नुकतीच ‘पिंकविला’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी संजय दत्तबाबतचा एक किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले, “मला संजय दत्तने चित्रपटाची स्क्रिप्ट सांगण्यासाठी एक वेळ दिली होती. माझी संजय दत्तबरोबर अपॉइंटमेंट होती. पण, माझ्याकडे लिहिलेली स्क्रिप्ट तयार नव्हती. मीटिंगआधी मी एका रेस्टॉरंटमध्ये गेलो होतो. बकार्डी (Bacardi)चे दोन पेग ऑर्डर केले. वेटरचे नोट पॅड घेतले आणि त्यावर स्क्रिप्टचे मुद्दे लिहिले. मी ते एका ओळीत लिहिले होते. तसे मी २५ सीन तयार केले. त्यानंतर मी लिहिणे थांबवले. कारण- स्क्रिप्ट माझ्या डोक्यात तयार होती.

पुढे महेश मांजरेकर यांनी संजय दत्तबरोबर त्यांची पहिली भेट ‘दुश्मन’ चित्रपटाच्या सेटवर कशी झाली होती, हे सांगताना म्हटले, “संजय दत्तची पाठ माझ्याकडे होती आणि त्याच्याबरोबर संजय छैलही होता. संजय छैलचे वडील चित्रपटाचे प्रोडक्शन डिझायनर होते आणि त्यांनी माझ्याकडे पाहून हात हलवला. संजय दत्तने मागे वळून माझ्याकडे पाहिले आणि त्याच्या चेहऱ्यावर ‘हा इथे काय करतोय’, असे भाव दिसले. मला खात्री होती की, त्याने मागे वळून शिवीगाळ केली. संजय दत्त संजय छैलला नेमकं काय म्हणाला हे मला माहित नव्हतं. पण संजय छैलच्या चेहऱ्यावरचे भाव बघून ते अपशब्द असल्याचं समजलं.जय दत्त संजय छैलला नेमकं काय म्हणाला हे मला माहीत नव्हतं. पण, संजय छैलच्या चेहऱ्यावरचे भाव बघून, ते अपशब्द असल्याचं समजलं. मला कोणीही ओळखत नव्हतं. कोणीही मला बसायला जागा दिली नव्हती.”

पुढे महेश मांजरेकर यांनी सांगितले की, मी तिथेच सेटवर इकडे-तिकडे फिरत होतो. कारण- मला माहीत होते की, मी तिथून एकदा गेलो, तर संजय दत्त मला पुन्हा फोन करणार नाही. खरं तर संजू मी निघून जाण्याची वाट पाहत होता आणि ब्रेक न घेता शूटिंग चालू होतं. मला वाटतं, काही काळानंतर त्याला जाणवलं की, मी जाणार नाही. मग त्यानं मला प्रश्न विचारला की, तुम्हाला स्क्रिप्ट सांगण्यासाठी किती वेळ लागेल? मी म्हटले की, १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही. त्यानंतर आम्ही त्याच्या खोलीत गेलो आणि पहिल्या पाच मिनिटांनंतर त्यानं इतर सर्वांना निघून जाण्यास सांगितलं. मी जवळजवळ दीड तास त्याला चित्रपटाची कथा सांगत होतो. तो ती गोष्ट ऐकून थक्क झाला होता. संजय दत्तनं लगेच एका निर्मात्याला बोलावलं.

वास्तव या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक अडचणी निर्माण झाल्या. याबद्दल बोलताना महेश मांजरेकर यांनी म्हटले की त्या काळात संजय दत्तला दर दिवशी ९ ते ५ या वेळेत कोर्टात जावे लागत असे. त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग संध्याकाळी ६ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत करत असू. जेव्हा चित्रपट जवळजवळ ३५% पूर्ण झाला तेव्हा निर्मात्याकडे पैसे नसल्याने त्याला बाहेर पडावे लागले. त्यानंतर श्याम श्रॉफ या व्यक्तीने आम्ही जे शूटिंग केले होते ते पाहिले आणि त्यांना ते चांगले वाटले. त्यांनी मुंबई प्रदेशाचे हक्क ५० लाख रुपयांना विकत घेतले आणि आम्हाला २५ लाख रुपये आधीच दिले. त्यानंतर, आम्ही पुन्हा शूटिंग सुरू केले. ते पैसे संपल्यानंतर, आम्ही इतर प्रदेशाचे हक्क विकले आणि या पैशातून आम्ही ‘वास्तव’चे शूटिंग पूर्ण केले.

वास्तव या चित्रपटानंतर महेश मांजरेकर व संजय दत्त यांनी ‘वास्तव’च्या सीक्वेल, ‘हत्यार’, ‘कुरुक्षेत्र’, ‘पिता’ या चित्रपटांचे दिग्दर्शन संजय दत्तने केले होते. त्यांनी ‘मुसाफिर’, ‘जिंदा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे. दरम्यान, ‘वास्तव’ या चित्रपटात संजय दत्तसह परेश रावल, मोहनीश बहल, नम्रता शिरोडकर, शिवाजी साटम, रीमा लागू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांत दिसले होते.