सूरज भाटिया दिग्दर्शित ‘हम साथ साथ है'(Hum Saath-Saath Hai) हा चित्रपट १९९९ ला प्रदर्शित झाला होता. सलमान खान, तब्बू, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे,करिश्मा कपूर, मोहनशी बाहल, नीलम कोठारी(Neelam Kothari), अलोक नाथ, महेश ठाकूर(Mahesh Thakur), शक्ती कपूर, रीमा लागू, सदाशिव अमरापूर असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात होते. प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडल्याचे पाहायला मिळाले. आता महेश ठाकूर यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान नीलम कोठारी त्यांच्यावर चिडल्याची आठवण सांगितली आहे. या चित्रपटात महेश ठाकूर आणि नीलम कोठारी यांनी विवाहित जोडप्याची भूमिका निभावली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा

महेश ठाकूर यांनी नुकतीच ‘रेडिओ नशा ऑफिशियल’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले, “आम्ही ए बी सी डी या गाण्याच्या शूटिंगला सुरुवात केली. बसमध्ये त्या गाण्याच्या डान्स स्टेप्स करताना मला अवघडल्यासारखं वाटत नव्हतं.आम्हाला डान्स करायचा होता आणि बससुद्धा रस्त्यानुसार हलत होती. या सगळ्यात माझी एक डान्स स्टेप चुकली आणि मी नीलमच्या अंगावर पडलो. त्यामुळे तिने थोडी चिडचिड केली. तिने मला म्हटले, “तू काय करतोयस?” त्या क्षणानंतर सलमान, सैफ व तब्बू असे सगळे तिला रॅगिंग करू लागले. ते तिला म्हणू लागले, “जर तो तुझ्या प्रेमात पडला, तर तो असा पडणार नाही”, त्यांच्या अशा विनोदामुळे वातावरणातील ताण हलका झाला. नीलमने माझ्याबद्दल मनात कोणताही राग धरला नाही. त्या विनोदामुळे आमच्यातील तणाव कमी झाला. त्यानंतर आम्ही मित्र झालो. सेटवर सर्व कलाकारांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते”, अशी आठवण महेश ठाकूर यांनी सांगितली आहे.

काही दिवसांपूर्वी करिश्मा कपूरने डान्स रिअ‍ॅलिटी शो इंडिया बेस्ट डान्सर ३ मध्ये हम साथ साथ है या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटवर मैत्रीपूर्ण वातावरण असल्याचे म्हटले होते. सोनाली बेंद्रेने पुस्तक बाजूला ठेवून, त्यांना गप्पांमध्ये सामील करण्यासाठी ती आणि तब्बू तिचे मन कसे वळवायचे याबद्दलचा किस्सा सांगितला होता.

हेही वाचा: Bigg Boss फेम अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, बाळाच्या नामकरण सोहळ्याला ३० हजार लोकांची उपस्थिती

करिश्मा कपूरने म्हटले होते की, आम्हाला ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या दिवसांची खूप आठवण येते. त्या वेळच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. सेटवर सोनाली खूप शांत असे आणि मी खूप बडबडी होते. सोनाली शांतपणे तिच्या पुस्तकांबरोबर बसलेली असे. मला आणि तब्बूला ती काय वाचत आहे, याबद्दल कायम उत्सुकता असायची. याबरोबरच ती आमच्याशी का बोलत नाही, असेही वाटायचे. मी आणि तब्बू चित्रपटांबद्दल, आम्ही कोणत्या गाण्याचे शूटिंग करणार आहोत, अशा विषयांबद्दल बोलायचो. सोनाली कोपऱ्यात बसलेले असायची आम्ही जेव्हा जेवायला जायचो, तेव्हा ती म्हणायची मी शाकाहारी जेवण करते. मी फक्त सलाद खाणार आहे. मी तिला म्हणायचे की, तुझे सलाद घेऊन ये.

१९९९ ला प्रदर्शित झालेला ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्या वर्षातील सर्वाधिक कमाई केली होती.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahesh thakur recalls i fell on neelam kothari got irriated hum saath saath hai shooting salman khan started ragging her nsp