बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीने शाहरुख खानच्या ‘परदेस’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं अन् प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. ‘परदेस’नंतर महिमाने वेगवेगळ्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली. आपल्या करीअरच्या शिखरावर असतानाच महिमाला एका भयानक अपघाताल सामोरं जावं लागलं होतं. यामुळे तिचं करिअर उद्ध्वस्तच झालं होतं. महिमाकडे बऱ्याच मोठ्या चित्रपटांच्या ऑफर असताना तिचा हा अपघात झाला होता.
महिमा तेव्हा ‘दिल क्या करे’ या चित्रपटाचे शूटिंग करत होती. एके दिवशी ती स्वत: सेटवर कार चालवत आली. दरम्यान, समोरून येणाऱ्या ट्रकने तिच्या कारला धडक दिली. या अपघातात महिमा गंभीर जखमी झाली असून सुमारे ६७ काचेचे तुकडे तिच्या चेहऱ्यावर रुतून बसले. या अपघातानंतर महिमाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. महिमाने एका मुलाखतीत सांगितले होते की, या अपघातानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ज्यामध्ये तिच्या चेहऱ्यावरून ६७ काचेचे तुकडे काढण्यात आले.
आणखी वाचा : ‘हा’ चित्रपट पाहण्यासाठी वयाची शंभरी पार करावी लागणार; २११५ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या या कलाकृतीबद्दल जाणून घ्या
महिमा म्हणाली की “मला वाटले की मी आता मृत्युमुखी पडेन, कोणीही मला रुग्णालयात नेणार नाही. दवाखान्यात पोहोचल्यानंतर बराच वेळाने माझी आई आणि अजय देवगण तिथे पोहोचले. ऑपरेशननंतर जेव्हा मी माझा चेहरा आरशात पाहिला तेव्हा मी खूप घाबरले. ‘दिल क्या करे’चे निर्माते अजय आणि काजोल यांनी माझ्या अपघाताबद्दल कोणालाच कळू दिले नाही, कारण त्यावेळी माझी संपूर्ण करीअर उद्ध्वस्त झालं असतं. माझ्यावर उत्तम उपचार व्हावेत यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले.”
कुठे आहे याची खबरबात कोणालाच नव्हती. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने या अपघाताबद्दल खुलासा केला होता. नंतर महिमा चौधरीला ब्रेस्ट कॅन्सरही झाला होता, अनुपम खेर यांनी सोशल मीडिया पोस्टमधून खुलासा केला होता. महिमाने कॅन्सरवरही मात केली आहे. सध्या ती सोशल मीडियावर सक्रिय असते. लवकरच ती कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात झळकणार आहे.