Mahima Chaudhry : महिमा चौधरी हे नाव घेतलं की समोर येतो तो तिचा परदेस हा सिनेमा. सुभाष घई दिग्दर्शित या सिनेमात महिमा चौधरी आणि शाहरुख खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला. यानंतर १९९९ मध्ये ‘दिल क्या करे’ या चित्रपटाच्या शुटिंगच्या दरम्यान महिमा चौधरीचा भीषण अपघात झाला होता. याबाबत महिमाने ( Mahima Chaudhry ) इतक्या वर्षांनी खुलासा केला आहे. एका मुलाखतीत महिमाने ( Mahima Chaudhry ) आपण तो अपघात अद्यापही विसरु शकलेलो नाही असं म्हटलं आहे.

महिमा चौधरीने काय म्हटलंय?

“माझा जो अपघात झाला, त्या अपघातानंतर मी पुन्हा चित्रपटांमध्ये काम करू शकणार नाही, असं मला वाटलं होतं. कारण त्या अपघातानंतर माझ्या चेहऱ्यावरुन डॉक्टरांनी ६७ काचेचे तुकडे काढले होते. आत्ताच्या काळात जर ही घटना घडली असती तर मला अनेक निर्माते, दिग्दर्शक यांनी पाठिंबा दिला असता. मात्र त्यावेळी असलेली परिस्थिती वेगळी होती. अभिनेता किंवा अभिनेत्रीचा इतका विचार कुणीही करत नव्हतं. अशी खंत महिमाने ( Mahima Chaudhry ) बोलून दाखवली.

priyanka chopra rakesh roshan
“अंत्यसंस्कार सुरू असताना…”, प्रियांका चोप्राने सांगितलं ‘क्रिश’ चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, म्हणाली, “मला भीती वाटली…”
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
rashmika mandanna salman khan
“मी आजारी आहे समजल्यावर…” रश्मिका मंदानाने सांगितला सलमान खानबरोबर काम करतानाचा ‘तो’ किस्सा, म्हणाली, “स्वप्न…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
Shabana Azmi And Nandita Das
“नंदिताने तिचे बोट माझ्या ओठांवर…”, ‘फायर’ चित्रपटातील इंटिमेट सीनबद्दल शबाना आझमी म्हणाल्या, “ते काही रोमँटिक…”
Tharala Tar Mag Monika Dabade New Car
‘ठरलं तर मग’ फेम अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी! नवऱ्यासह शेअर केले फोटो, मराठी कलाकारांकडून कौतुकाचा वर्षाव
Shabana Azmi Javed Akhtar
शबाना आझमींना चेटकिणीच्या रुपात पाहून जावेद अख्तर यांनी दिलेली ‘अशी’ प्रतिक्रिया, म्हणालेले, “सगळा मेकअप…”
Shabana Azmi
“वाईट कलाकार हे वाईट कलाकारच असतात”, शबाना आझमींचे स्पष्ट वक्तव्य; म्हणाल्या, “चांगले दिसणाऱ्यांकडे…”

माझा चेहरा पूर्णच बिघडून गेला होता

‘रेडिओ नशा’ला दिलेल्या मुलाखतीत महिमा म्हणाली, “जेव्हा माझा अपघात झाला होता, तेव्हा मला जाणवलं नव्हतं की माझ्या चेहऱ्यावर इतक्या जखमा असतील. अपघातानंतर मी बाथरुममध्ये गेले आणि आरशात चेहरा पाहिला, तेव्हा मला समजलं होतं की जखमा झाल्या आहेत. त्याआधी मी दिग्दर्शक प्रकाश झा यांना सांगत होते की जर गंभीर काही नसेल तर आपण शूटिंग पूर्ववत करू शकतो. कारण डॉक्टरांनी स्कॅन वगैरे केलं होतं. त्यानंतर डॉक्टरांनी शुटिंग पुढे सुरु करायला नकार दिला. मात्र मी जेव्हा आरशात माझा चेहरा पाहिला, तेव्हाच मला जाणवलं की माझा पूर्ण चेहराच खराब झाला आहे.” असं महिमा चौधरी ( Mahima Chaudhry ) म्हणाली.

हे पण वाचा- कर्करोगावर मात करणाऱ्या महिमा चौधरीने हिना खानची घेतली भेट, अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली….

अजय देवगण आणि प्रकाश झा यांना विनंती

मी त्यावेळी अजय देवगण आणि प्रकाश झा या दोघांनीही विनंती केली मला जो अपघात झाला आहे त्याबाबत कुठेही वाच्यता करु नका. माझा चेहरा खराब झाला आहे हे कुणाला सांगू नका. मला किमान माझं करिअर वाचवण्याची संधी द्या, तसा प्रयत्न मला करु द्या. त्यानंतर त्या दोघांनीही याबाबत मौन बाळगलं. अजयने मला धीर दिला होता, तो म्हणाला तू काळजी करु नकोस. सर्जरीनंतर सगळं काही ठीक होईल. मला त्यावेळी विश्वास बसत नव्हता. मी करिअरच्या दुसऱ्या पर्यायाचा विचारही करु लागले होते. मी त्या अपघातानंतर माझ्या चेहऱ्याची एक बाजूच कॅमेरासमोर दाखवत असे. आजही माझा एक डोळा दुसऱ्या डोळ्यापेक्षा थोडा लहान आहे असंही महिमाने सांगितलं.

Story img Loader