माहिरा खान ही पाकिस्तानमधील लोकप्रिय व सर्वाधिक मानधन मिळवत असलेल्या अभिनेत्रींपैकी एक आहे. २०१७ साली प्रदर्शित झालेल्या ‘रईस’ या चित्रपटातून तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटात तिने शाहरूखच्या नायिकेची भूमिका साकारली होती. माहिरा अभिनयासह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते. २०२३ मध्ये माहिराने सलीम करीमशी दुसरं लग्न केलं. आता माहिरा लवकरच गुड न्यूज देणार असल्याचं म्हटलं जातंय. सोशल मीडियावर याबाबतची एक पोस्ट व्हायरल होताना दिसते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ई-टाइम्स’च्या रिपोर्टनुसार व्हायरल होणाऱ्या पोस्टमध्ये म्हटलं जातंय की माहिरा खान दुसऱ्यांदा आई होणार आहे. माहिराने ओटीटीचे दोन प्रोजेक्ट्सही नाकारले आहेत. या पोस्टनुसार माहिरा खान ऑगस्ट किंवा सप्टेंबर २०२४ मध्ये नव्या पाहुण्याचं स्वागत करणार आहे. यासाठीच माहिरा काही काळ अभिनय क्षेत्रापासून दूर आहे. बाळाला जन्म दिल्यानंतरच ती पुन्हा काम सुरू करेल. दरम्यान, माहिराने अजूनही प्रेग्नेंसीची बातमी अधिकृतरित्या जाहीर दिलेली नाही. माहिरा आणि सलीम लवकरच ही गोड बातमी जाहीर करतील असं म्हटलं जातंय.

हेही वाचा… “संपूर्ण भारत राममय आहे,” ‘रामायण’ मधील सुनील लहरी यांनी व्यक्त केली खंत; म्हणाले, “लक्ष्मण या नावाचं..”

या गुड न्यूजसाठी चाहते माहिराचं अभिनंदन करत आहेत. रेडिट या प्लॅटफॉर्मवर चाहत्यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत. एकाने लिहिलं, मला आशा आहे की हे खरं आहे, असं असेल तर ही खूप छान गोष्ट आहे. तर दुसऱ्याने लिहिलं, जर हे खरं असेल तर मी माहिरा-सलीमसाठी आनंदी आहे.

हेही वाचा… अदा शर्माने नेसली आजीची ६५ वर्षे जुनी साडी; म्हणाली, “माझी आजी जेव्हा २५ वर्षांची…”

दरम्यान माहिराच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचं झालं तर, माहिरा खान २००७ मध्ये अली अस्करीशी लग्नबंधनात अडकली होती परंतु २०१५ मध्येच त्यांचा घटस्फोट झाला. त्यांचा मुलगा अझलान याचा ते दोघंही सांभाळ करतात.
ऑक्टोबर २०२३ मध्ये माहिराने उद्योगपती सलीम करीमशी दुसरं लग्न केलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahira khan pregnancy raees fame pakistani actress is pregnant post went viral dvr