“बीस सालों के जख्म, बीस दिनों में नहीं भरे जाते हैं।”

भावाच्या शोधात निघालेला मेजर राम, महाविद्यालयात शिक्षण घेणारा पण उनाड आयुष्य जगणारा लक्ष्मण ( लकी ), कॉलेजच्या कॅम्पसमध्ये सर्वांची लाडकी असणारी संजना बक्षी अन् जिच्या एन्ट्रीने २० वर्षांपूर्वी चित्रपटगृहात एकच जल्लोष करण्यात आला अशी चांदनी चोप्रा. या चौघांची कथा सुरु होते दार्जिलिंगमध्ये…जनरल बक्षींच्या लाडक्या लेकीचं अर्थात संजनाचं रक्षण करण्यासाठी रामला ‘प्रोजेक्ट मिलाप’ अंतर्गत ओळख बदलून दार्जिलिंगमधील एका महाविद्यालयात पाठवण्यात येतं. या सेंट पॉल कॉलेजमध्ये राम फक्त संजनाच नव्हे तर सर्वांच्या मदतीसाठी तत्पर असतो. प्रत्येकाला आपलंसं करून तो नेहमीच म्हणतो ‘मै हूँ ना’!

Salim Khan
“काही वर्षानंतर…”, हेलन व सलमा खान यांच्यातील नात्यावर बोलताना सलीम खान म्हणाले…
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Huppa Huiyya 2 announcement
ठरलं! १५ वर्षांनी येणार मराठी चित्रपट ‘हुप्पा हुय्या’चा सिक्वेल, दिग्दर्शकाने केली घोषणा
shahrukh khan
चाहत्याने शाहरूख खानच्या परवानगीशिवाय सेल्फी काढण्याचा प्रयत्न केलेला, तेव्हा…; किंग खानबद्दल बॉडीगार्डचा खुलासा, म्हणाला, “खासगी वेळ…”
kartik aaryan got degree after 10 years
Video : कार्तिक आर्यनला दहा वर्षानंतर मिळाली इंजिनिअरिंगची पदवी; व्हिडीओ शेअर करत अभिनेता म्हणाला, “बॅकबेंचरपासून ते…”
Shahrukh Khan And Manisha koirala
“त्याच्या फ्लॅटमध्ये चटई अंथरलेली असे अन्…”; मनीषा कोईरालाने सांगितली शाहरुख खान स्टार होण्यापूर्वीच्या दिवसांची आठवण
Rajesh Khanna
सात वर्षे लिव्ह इन, अभिनेत्रींबरोबर अफेअर्सच्या चर्चा अन् डिंपल कपाडियांशी लग्न; राजेश खन्ना-अंजू महेंद्रूच्या लव्ह स्टोरीचा ‘असा’ झालेला शेवट
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

३० एप्रिल २००४ म्हणजेच बरोबर २० वर्षांपूर्वी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘मै हूँ ना’मधील प्रत्येक पात्र, संवाद, गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. फराह खानचा हा पहिलाच चित्रपट. खरंतर ती या चित्रपटावर २००१ पासून काम करत होती परंतु, काही कारणास्तव हा चित्रपट वेळेत पूर्ण होऊ शकला नव्हता. अखेर रेड चिलीज एंटरटेनमेंट अंतर्गत निर्मिती आणि वितरित केलेला हा पहिला चित्रपट ठरला. शाहरुखची पत्नी गौरी खानने या चित्रपटाची निर्मिती केली होती. अर्थात, प्रदर्शित झाल्यावर सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे ‘मै हूँ ना’ चित्रपटाने दमदार कमाई केली. १५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने एकूण ८४ कोटींचा गल्ला जमावला होता. ‘वीर-झारा’नंतर सर्वाधिक कमाई करणारा २००४ सालचा हा दुसरा चित्रपट होता.

ॲक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि संगीत या चारही गोष्टींचा सुंदर मिलाफ साधणं हेच ‘मै हूँ ना’ चित्रपटाचं सर्वात मोठं यश होतं. या चित्रपटाच्या निमित्ताने फराह खानने दिग्दर्शन आणि पटकथा लेखक म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. आज चित्रपटाला २० वर्षे पूर्ण होणार असल्याने याबद्दल काही न ऐकलेले किस्से जाणून घेऊयात…

मूळ नाव होतं वेगळंच…

‘मै हूँ ना’ चित्रपटाचं नाव सुरुवातीला संपूर्ण टीमला ‘द आउटसाइडर’ असं ठेवायचं होतं. अगदी शाहरुखला सुद्धा ‘मै हूँ ना’ नाव आवडलं नव्हतं. त्याला हे नाव कुठेतरी अपूर्ण वाटत होतं. मात्र, चित्रपटाचं टायटल ट्रॅक ऐकल्यानंतर किंग खानचं मन पूर्णपणे पालटलं. याशिवाय दिग्दर्शक फराह खानला या चित्रपटाचं नाव ‘हम तुम’ ठेवायचं होतं. विशेष म्हणजे सैफ अली खानच्या ‘हम तुम’ला त्याचवर्षी फिल्मफेअर मिळाला होता. एप्रिलमध्ये ‘मै हूँ ना’ तर, ‘हम तुम’ मे महिन्यात प्रदर्शित झाला होता.

‘हे’ कलाकार नव्हते पहिली पसंती

‘मै हूँ ना’ मध्ये सुनील शेट्टीने ‘राघवन’ ही भूमिका साकारली आहे. नसीरुद्दीन शाहने हे पात्र साकारावं अशी फराह खानची खूप इच्छा होती. परंतु, एका अन्य कामात व्यग्र असल्याने ही भूमिका शेवटी ‘अन्ना’च्या पदरी पडली. याशिवाय झायद खानने साकारलेली लक्ष्मण (लकी) ही भूमिका आधी अनुक्रमे फरहान अख्तर, हृतिक रोशन, सोहेल खान यांना ऑफर करण्यात आली होती. अगदी शेवटी झायदचं नाव निश्चित करण्यात आलं. तसेच अमृता रावने साकारलेल्या संजना या पात्रासाठी सुद्धा सुरुवातीला अमिषा पटेल आणि आयेशा टाकिया यांचा विचार करण्यात आला होता.

‘मै हूँ ना’ मध्ये सुश्मिता सेनने प्रेक्षकांचं सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या मिस युनिव्हर्सच्या साड्यांची विशेष चर्चा रंगली होती. परंतु, तिने साकारलेली चांदनी चोप्रा भूमिका ऐश्वर्या रायने साकारावी अशी सगळ्यांची इच्छा होती. पण, २००२-२००३ मध्ये ‘चलते चलते’च्या सेटवर झालेल्या गोंधळानंतर ऐश्वर्याच्या जागी सुश्मिताची चित्रपटात वर्णी लागली.

तब्बूचा कॅमिओ

राणी मुखर्जीने ‘मै हूँ ना’ मध्ये कॅमिओ करावा अशी फराहची इच्छा होती. परंतु, काही कारणास्तव त्यांच्या तारखा जुळून आल्या नाहीत. अखेर चित्रपटात प्रेक्षकांना तब्बूचा कॅमिओ पाहायला मिळाला. शाहरुख खान ‘प्रॉम नाइट’च्या डान्सचा सराव करत असताना बाजूलाच एका सीनमध्ये तब्बू पाहायला मिळते. त्यावेळी तब्बू दार्जिलिंगमध्ये एका वेगळ्याच चित्रपटाचं शूटिंग करत होती. ती खास फराहला भेटण्यासाठी ‘मै हूँ ना’च्या सेटवर पोहोचली. एवढ्यात फराहने तसंच मेकअपशिवाय तिला एका शॉटसाठी उभं केलं. या सीनसाठी तब्बूने कपडे देखील स्वत:चे परिधान केले होते. अगदी काही सेकंदासाठी चाहत्यांना तब्बूची झलक पाहायला मिळाली होती.

tabbu cameo in main hoon na
‘मै हूँ ना’ मध्ये तब्बूचा कॅमिओ

चित्रपट फराहसाठी ठरला खास

‘मै हूँ ना’ चित्रपट फराहसाठी सर्वाधिक खास ठरला कारण, यामुळे तिच्या खऱ्या आयुष्यातील प्रेमकहाणी फुलली. पहिल्या नजरेतच फराह शिरिष कुंदरच्या प्रेमात पडली. शिरिषने या चित्रपटासाठी एडिटर म्हणून जबाबदारी सांभाळली होती. फराहने एप्रिलमध्ये ‘मै हूँ ना’ प्रदर्शित झाल्यावर पुढे, ९ डिसेंबर २००४ रोजी शिरीष कुंदरशी लग्न केलं. आता या जोडप्याला एक मुलगा आणि दोन मुली अशी तीन मुलं आहेत.

‘चले जैसे हवाएं’ – वन टेक शूट झालेलं गाणं

झायद खान आणि अमृता राव यांचा परिचय ‘मै हूँ ना’ मध्ये ‘चले जैसे हवाएं’ या गाण्यामार्फत करण्यात आला आहे. हे संपूर्ण गाणं दीड दिवसांत वन टेक शूट करण्यात आलं आहे. यासाठी प्रचंड मेहनत घेतल्याचं झायदने मध्यंतरी एका मुलाखतीत सांगितलं होतं. तसेच “शूटिंगदरम्यान फराह प्रचंड ओरडायची आणि म्हणूनच मी चांगलं काम करू शकलो” असंही त्याने सांगितलं होतं.

‘मै हूँ ना’ चित्रपटातील “तुमसे मिलके दिल का है जो हाल क्या करें” ही कव्वाली विशेष चर्चेत आली होती. परंतु, तुम्हाला माहितीये का भलेही ही कव्वाली आता प्रचंड लोकप्रिय असली तरीही, सुरुवातीला या गाण्यापासून शाहरुख खान आनंदी नव्हता. गाण्याची कोरिओग्राफी व साउंडट्रॅक बदलण्याची विनंती त्याने फराहकडे केली होती. पण, फराह तिच्या निर्णयावर ठाम होती. तिने शाहरुखची समजूत घातली आणि कव्वाली तशीच ठेवली. अनु मलिक यांनी कंपोझ केलेलं हे चित्रपटातील पहिलं गाणं ठरलं. आजच्या घडीला ही कव्वाली सदाबहार गाण्यांपैकी एक म्हणून ओळखली जाते.

अशा या ‘मै हूँ ना’ चित्रपटाला आज बरोबर २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आज वीस वर्षांनंतरही चित्रपटाची लोकप्रियता कायम आहे. यातून एक गोष्ट खरोखरंच शिकण्यासारखी आहे ती म्हणजे कुटुंब, मित्र, आयुष्यातील कठीण काळातून मार्ग काढताना फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे “फासला कितना भी लंबा हो शुरुआत एक कदम से होती हैं!”

Story img Loader