एक काळ गाजवणाऱ्या बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री आता चित्रपटात जरी दिसत नसल्या तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या चांगल्याच सक्रिय असतात. असंच ९० चं दशक गाजवणारी अभिनेत्री भाग्यश्री सध्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.बॉलिवूडचा दबंग भाईजान सलमान खानबरोबर चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी भाग्यश्री फार काळ मनोरंजविश्वात रमलीच नाही. हातावर मोजण्याएवढे चित्रपट तिने केले आणि मग उद्योगपती आणि निर्माता हिमालय दसानी यांच्याशी लग्न करून ती संसारात रुळली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र ती सतत चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतंच तिचे पती हिमालय दसानी यांच्याबद्दल तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचे पती हिमालय यांच्या खांद्यावर एक गंभीर शस्त्रक्रिया पार पडली असून त्यांना मुंबईच्या इस्पितळात दखल केलं आहे. या पोस्टमधून भाग्यश्री सांगू इच्छिते की, कोणतीही गंभीर शस्त्रक्रिया असो, मनात असेल तर त्यातून पटापट बाहेर पडता येतं. असं म्हणत तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

तब्बल ४ ते ५ तास ही शस्त्रक्रिया सुरू होती, आणि त्यातून सुखरूप बाहेर येऊन हिमालय सध्या विश्रांती घेत असल्याचं तिने पोस्टमध्ये सांगितलं आहे. सुरुवातीला अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाल्याने भाग्यश्रीने तिथल्या डॉक्टरांचे आणि वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांचे आभार मानले. भाग्यश्रीच्या या व्हिडिओवर अभिनेता संजय कपुर आणि अभिनेत्री अर्चना पूरण सिंग यांनी कॉमेंट करत हिमालय यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे आणि त्यांना लवकर बरं वाटावं यासाठी प्रार्थनादेखील केली आहे.

भाग्यश्रीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही कॉमेंट करून पतीच्या तब्येतीसाठी काळजी दर्शवली आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थनादेखील केली आहे. १९९० साली भाग्यश्रीने हिमालय यांच्याबरोबर लग्न केलं आणि मग तिने चित्रपटसृष्टीतून संन्यास घेतला. तिची दोन्ही मुलं अभिमन्यु आणि अवंतिका हे दोघेही मनोरंजनविश्वात कार्यरत आहेत. अभिमन्युचा नुकताच शिल्पा शेट्टीबरोबर ‘निकम्मा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maine pyaar kiya actress bhagyashree husband went through major shoulder surgery avn
Show comments